Home » Blog » आरएसएसच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसच्या अभिजीत वंजारींनी फडकावला झेंडा

आरएसएसच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसच्या अभिजीत वंजारींनी फडकावला झेंडा

by प्रतिनिधी
0 comments
Abhijeet Vanjari wins in the Nagpur Graduates' constituency

नागपूर : प्रतिनिधी :  नागपूर विभाग विधान परिषद पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार अभिजीत वंजारी यांनी विजय मिळविला. पडल्याने राष्ट्रीय स्वयंसेवक आणि भाजपच्या बालेकिल्ल्यात सलग दुसऱ्यांना आमदार अभिजीत वंजारींनी काँग्रेसचा झेंडा फडकावला. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे बंडखोर उमेदवार नितेश कराळे यांच्या २६ हजार मतपत्रिकेवरील दुसऱ्या क्रमांकाची मते वंजारी यांना मिळाल्याने त्यांनी भाजपच्या सुधाकर कोहळेंचा पराभव केला.  देशभरात झालेल्या विधान परिषद निवडणुकीत वंजारींच्या रुपाने काँग्रेसच्या पदरात एकमेव जागा मिळाल्याने त्यांना भोपळा फोडता आला.

अभिजीत वंजारी यांना प्रथम व द्वितीय पसंतीक्रमाची एकूण ६७ हजार २३१ मते मिळाली. तर त्यांचे नजिकचे प्रतिस्पर्धी भाजपचे सुधाकर कोहळे यांना ६३ हजार ९६० मते मिळाली. निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी अभिजित वंजारी यांना विजयाचे प्रमाणपत्र प्रदान केले. (Abhijeet Vanjari wins in the Nagpur Graduates’ constituency)

नागपूरच्या मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुलात मंगळवारी सकाळी आठ वाजता ८४ टेबलवरून मतमोजणीला सुरुवात झाली. ४१ पेक्षा जास्त तासांपासून ही मतमोजणी सुरू होती. यावेळी निवडणूक निरीक्षक डॉ.हर्षदीप कांबळे, निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, विभागातील सर्व जिल्ह्याचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी, मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. (Abhijeet Vanjari wins in the Nagpur Graduates’ constituency)

नितेश कराळेंच्या मतपत्रिकेवरील दुसऱ्या क्रमांकाची मते ठरली गेमचेंजर

पहिल्या पसंतीच्या दोन फेऱ्यांमध्ये कोणत्याही उमेदवाराला विजयासाठी आवश्यक ७५ हजार ४३८ मतांचा कोटा पूर्ण करता आला नाही. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेनुसार द्वितीय पसंतीक्रमाची बाद फेरी घेण्यात आली. पहिल्या पसंतीच्या दोन फेऱ्यांमध्ये १ लाख ६५ हजार ९०६ मतांपैकी १५ हजार ३२ मते अवैध ठरली. तर १ लाख ५० हजार ८७४ मते वैध ठरली.दुसऱ्या पसंतीच्या बाद फेऱ्यामध्येही तिसऱ्या क्रमांकावर २६ हजार मते मिळवलेल्या नितेश कराळे यांच्या मतपत्रिकेवरील दुसऱ्या क्रमांकाची मते गेमचेंजर ठरली. निवडणुकीत प्रचाराच्यावेळी नितेश कराळे यांनी प्रथम पसंतीचे मत मागताना भाजप वगळून दुसऱ्या क्रमांकाचे मत दुसऱ्या उमेदवाराला द्या असे आवाहन केले होते. कराळेंच्या मतपत्रिकेवर वंजारींना दुसऱ्या पसंतीची मते मोठ्या संख्येने पडल्याने चार हजार हून अधिक मतांनी आघाडीवर असलेल्या भाजपचे उमेदवार सुधाकार कोहळे यांचे मताधिक्य वेगाने घसरले आणि वंजारी यांनी आघाडी घेतली. पहिल्या व द्वितीय पसंतीक्रमाच्या बाद फेरी मिळून सर्वाधिक ६७ हजार २३१ मते घेणाऱ्या अभिजित वंजारी यांना विजयी घोषीत करण्यात आले. (Abhijeet Vanjari wins in the Nagpur Graduates’ constituency)

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!