Home » Blog » कोल्हापूरची शतकोत्तर फुटबॉल परंपरा विकसित करणार : मधुरिमाराजे

कोल्हापूरची शतकोत्तर फुटबॉल परंपरा विकसित करणार : मधुरिमाराजे

by प्रतिनिधी
0 comments
Madhurimaraje pledges to develop Kolhapur's football tradition

कोल्हापूर : प्रतिनिधी : कमी सुविधा, बेताची आर्थिक परिस्थित असतानाही शंभर वर्षात  प्रॅक्टिस क्लबच्या खेळाडूंनी जिद्दीने फुटबॉलचा विकास आणि विस्तार केला. क्लबच्या विकासात जुन्या आणि वयोवृध्द् खेळाडूंची योगदान मोलाचे आहे. त्यांच्याच पाऊलावर पाऊल ठेवत पुढील पिढ्यांनी प्रॅक्टिस क्लब नावारुपाला आणला. आजही शंभर वर्षात पदार्पण करणाऱ्या प्रॅक्टिस क्लबने कोल्हापूर फुटबॉल विश्वात आपला दबदबा कायम ठेवला आहे. कोल्हापूरची ही शतकोत्तर फुटबॉल परंपरा विकसीत करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्याची ग्वाही  वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनच्या (विफा) महिला अध्यक्षा मधुरिमाराजे यांनी दिली. (Madhurimaraje pledges to develop Kolhapur’s football tradition)

मंगळवार पेठेतील सुबराव गवळी तालमीच्या प्रॅक्टीस फुटबॉल क्लबच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त ज्येष्ठ फुटबॉलपटू, आजी माजी खेळाडू व प्रॅक्टीस क्लबच्या शिलेदारांचा गौरव राजर्षी शाहू मार्केट यार्ड येथील रामकृष्णच्या प्रांगणात झाला. मधुरिमाराजे यांच्या हस्ते खेळाडू आणि त्यांच्या कुटुंबियाचा गौरव करण्यात आला. डोक्यावर फर कॅप, गळ्यात मानाचा प्रॅक्टिस क्लबचा स्कार्फ, प्रॅक्टीस क्लबच्या शताब्दीचा सिंबॉल असणारी फ्रेम देऊन गौरव करण्यात आला.

यावेळी मधुरिमाराजे यांच्यासह नगरसेविका जयश्री चव्हाण, माधुरी नकाते व नीलांबरी साळोखे यांची प्रमुख उपस्थिती होती. मधुरिमाराजे यांनी उपस्थित फुटबॉलपटूं व त्यांच्या कुटूंबीयांशी संवाद साधत कोल्हापूरच्या फुटबॉल विकासासाठी केएसएकडून सुरु असणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. (Madhurimaraje pledges to develop Kolhapur’s football tradition)

 कार्यक्रमात बाबासाहेब सूर्यवंशी (वय ९५), अरुण नरके, पांडूरंग वडगांवकर, रंगराव निंबाळकर, बाळासाहेब दामुगडे, अत्युत साळोखे, प्रकाश रेडेकर, चंचल देशपांडे, संभाजीराव पाटील-मांगोरे, मानसिंग मंडलिक, दीपक शेळके, विश्वास कांबळे, रिची फर्नांडीस, राजेंद्र दळवी, संभाजी जाधव, सुनील खिरुगडे, प्रकाश पाटील, कैलास पाटील, नगरसेवक आश्किन आजरेकर, सुनील मुळीक, विनायक पाटील,  यांच्यासह आडूरकर, साळोखे, मोरे, पाटील, ढोबळे, पसारे, मिर शिकारी, मंडलिक कुटूंबातील तीन पिढ्यातील फुटबॉलपटूंचा समावेश होता. कार्यक्रमांचे संयोजन प्रॅक्टिस क्लबचे अध्यक्ष नितीन सावंत, उपाध्यक्ष संतोष महाडिक, सचिव रमेश मोरे  आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केले. (Madhurimaraje pledges to develop Kolhapur’s football tradition)

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!