Home » Blog » निवडणूक आयोगाविरोधात इंडिया आघाडीने खोलला मोर्चा

निवडणूक आयोगाविरोधात इंडिया आघाडीने खोलला मोर्चा

by प्रतिनिधी
0 comments
INDIA bloc's protest against the Election Commission

कोल्हापूर : प्रतिनिधी : केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या विरोधात विरोधी पक्षाने रणशिंग फुंकले असून सहा ऑक्टोबर रोजी दिल्लीत निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय झाला. तसेच २ ऑक्टोबर ते ८ ऑक्टोबर या कालावधीत देशभरातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात सर्व विरोधी पक्षाचे नेते राष्ट्रपतीं द्रोपदी मुर्मु यांची भेट घेणार आहेत. तसेच देशभरातील पाच प्रमुख शहरात जनजागृतीसाठी मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. (INDIA bloc’s protest against the Election Commission)

इंडिया आघाडीची आज दिल्लीत महत्वाची बैठक झाली. बैठकीला काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे, खासदार सोनिया गांधी, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहूल गांधी, काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला, पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, खासदार सुप्रिया सुळे, मेहबुबा मुक्ती यांच्यासह विरोधी पक्षातील नेते उपस्थित होते.

निवडणूक प्रक्रियेतील गोंधळाविरोधात देशव्यापी आंदोलन करण्याबाबत चर्चा झाली. तसेच निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार आणि केंद्र सरकारविरोधात रणनिती निश्चित करण्यात आली. इंडिया आघाडीच्यावतीने देशभरातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर २ ते ६ ऑक्टोबर या काळात आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. तसेच सहा ऑक्टोबर रोजी निवडणूक कार्यालयावर मोर्चा काढण्याची घोषणा मल्लिकार्जुन खर्गे यांनी केली. या मोर्चात विरोधी पक्षातील नेते आणि खासदार सहभागी होणार आहेत. निवडणूक आयोगाच्या चुकीच्या कार्यपद्धतीबद्दल जनजागृती करण्यासाठी आंदोलन करण्यात येणार असेही खर्गे सांगितले. (INDIA bloc’s protest against the Election Commission)

ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात राष्ट्रपतीची भेट विरोधी पक्षांचे ने घेणार आहेत. राष्ट्रपतींना निवेदन देण्यात येणार आहे. चौथ्या टप्प्यात देशभरातील पाच मोठ्या शहरात सभा घेण्याचा निर्णय घेण्यात आला. सभेच्या तारखा आणि ठिकाणे नंतर निश्चित करण्यात येणार आहे. (INDIA bloc’s protest against the Election Commission)

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!