Home » Blog » खुशी कांबोज अमेरिकेतील ‘कॅम्प ऑगस्टा’ च्या “वील्डरनेस प्रोग्राम” ची संचालक

खुशी कांबोज अमेरिकेतील ‘कॅम्प ऑगस्टा’ च्या “वील्डरनेस प्रोग्राम” ची संचालक

by प्रतिनिधी
0 comments
Khushi Kamboj, Director of 'Camp Augusta'

कोल्हापूर : प्रतिनिधी :  कोल्हापूरची ‘माउंटेनिअरिंग क्विन’ गिर्यारोहक आणि साहसी खेळातील प्रदीर्घ अनुभव असणाऱी खुशी कांबोज हिची  अमेरिकेतील ‘कॅम्प ऑगस्टा’ च्या “वील्डरनेस प्रोग्राम” संचालक पदी निवड झाली. आजच्या घडीला, ‘कॅम्प ऑगस्टा’ जगातील सर्वात वेगळ्या समर कॅम्प पैकी एक मानला जातो. १९३१ मध्ये सुरू झालेला कॅम्प ऑगस्टा, हा फक्त समर कॅम्प नाहीतर, निसर्ग, साहस, मैत्री, आणि आयुष्यभरासाठी प्रेरणा देणारे अनुभव घडवणारे जादुई ठिकाण आहे. (Khushi Kamboj, Director of ‘Camp Augusta’)

कॅम्प ऑगस्टात एक वर्ष कार्यरत असलेल्या खुशीला बढती

खुशी कांबोज २०२५ पासून कॅम्प ऑगस्टा येथे कौन्सिलर म्हणून कार्यरत आहे. कॅम्प ऑगस्टा मध्ये कौन्सिलर मुलांच्यावर फक्त लक्ष ठेवत नाहीत, तर ते मुलांसोबतच राहतात, त्यांचे ऐकून घेतात, त्यांना नवीन गोष्टी शिकवता, भीतीवर मात करण्यासाठी मदत करतात, त्यांचा आत्मविश्वास वाढवतात. कॅम्प ऑगस्टा चे ध्येय म्हणजे तिथे प्रत्येक मुला-मुलीस असे वातावरण दिले जाते, ज्यामुळे ती मुले-मुली नवीन गोष्टी करून पाहू शकतात, अपयशाला घाबरत नाहीत, स्वतःवर विश्वास ठेवायला शिकतात, इतरां बद्दल सहानुभूती विकसित करतात आणि निसर्गाशी त्यांचे घट्ट नाते जोडले जाते.या कॅम्पमध्ये खुशी मागील वर्षा पासून कार्यरत होती. तिचा अनुभव, मुलांना शिकवण्याची शैली, कामाप्रती तिची असणारी निष्ठा हे पाहूनच तिला “विल्डरनेस प्रोग्राम” डायरेक्टर पदावर काम करण्याची संधी मिळाली आहे.

वील्डरनेस प्रोग्राम पुन्हा सुरू करण्याची जबाबदारी

कोविड काळानंतर कॅम्प ऑगस्टा चे ‘वील्डरनेस प्रोग्राम’ बंद झाले होते. त्यांना हा साहसी विभाग पुन्हा सुरू करायचा होता. खुशीचे गिर्यारोहणातील अनुभव, त्यातील तिने घेतलेले तंत्रशुद्ध शिक्षण, मुलांना ते समजवण्याची आणी शिकविण्याची तिची हातोटी हे सर्व तिचे गुण पाहूनच त्यांनी खुशीला “विल्डरनेस प्रोग्राम” ची डायरेक्टरशिप घेऊन, तो विभाग पुन्हा कार्यान्वयीत करण्याची मोठी जबाबदारी तिच्यावर सोपविली आहे. वील्डरनेस हा विभाग नव्याने सुरू करत असताना, कोणत्या ऍक्टिव्हिटी घ्यायच्या, त्याचा एरिया कोणता असावा, तिथे शिक्षण प्रणाली काय असेल, त्यासाठी लागणारे प्रशिक्षक त्यांचे ट्रेनिंग, कॅम्पचे प्रमोशन, कॅम्प साठी लागणारी साधनसामग्री, या सर्वांसाठी लागणारे बजेट, सुरक्षा प्रणाली, खानपान व्यवस्था अशा अनेक गोष्टींचा समन्वय साधून, हा विभाग तिला कार्यान्वयीत करावा लागणार आहे. (Khushi Kamboj, Director of ‘Camp Augusta’)

कॅम्प ऑगस्टाची १९३१ मध्ये सुरुवात

१९३१ साली एडविन विल्यम एहमान आणि शार्लेट एहमान यांनी “कॅम्प ऑगस्टा” ची सुरवात केली. कॅलिफोर्निया स्टेट मधील, नेवाडा सिटी जवळील सियेरा नेवाडा पर्वतरांगांच्या, सुंदर जंगलामध्ये ९० एकर परिसरात हा कॅम्प आहे. ही जागा त्या काळातील ‘पिडमाऊंट कॅम्प फायर गर्ल्स’ या संस्थेला त्यांनी दान दिली होती. शार्लेट यांच्या आई ऑगस्टा कॉलीन्स यांच्या स्मरणार्थ, ‘कॅम्प ऑगस्टा’ असे नाव ठेवण्यात आले. आज जिथे कॅम्प आहे तिथे पूर्वी सोन्याच्या खाणी होत्या.

मुलींसोबत मुलांनाही कॅम्प ऑगस्टामध्ये प्रवेश

२००० च्या दशकात, संचालक रँडल ग्रेसन यांच्या नेतृत्वाखाली कॅम्प ऑगस्टा मध्ये मोठे बदल झाले. मुलींच्या सोबत मुलांनाही प्रवेश सुरू झाला . नवीन साहसी उपक्रम सुरू झाले. कॅम्प मध्ये फक्त ऍक्टिव्हिटी वर भर न ठेवता, कॅम्प मधील जादुई अनुभव, दृढ नातेसंबंध, सृजनशीलता आणि वैयक्तिक विकास यावर भर दिला गेला. (Khushi Kamboj, Director of ‘Camp Augusta’)

खुशीच्या आई वडिलांची प्रतिक्रिया

 साहसी क्रीडा प्रकारात, अमेरिकेसारख्या देशात अशी उच्चपदस्थ काम करण्याची संधी भारतात क्वचितच कोणाला मिळाली आहे. आपला स्वतःचा असा वेगळा छंद जोपासून, त्याच्या अनुभवावर जी उंची खुशीने गाठली आहे, त्याचा आम्हाला आई-वडील म्हणून सार्थ अभिमान आहे. आमच्याइतकेच किंवा त्याहूनही थोडे जास्त मार्गदर्शन खूशी ला कोणी केले असेल तर ते महीबूब मुजावर आणि गणेश गीध यांनी. खुशीच्या आजच्या या यशोगाथेमध्ये या दोघांचा वाटा खूप मोठा आहे एवढी मोठी जबाबदारी तिच्याकडून समर्थपणे पेलली जावी, यासाठी तुम्हा सर्वांच्या शुभेच्छा तिच्या पाठी राहोत

संगीता कांबोज, विनोद कांबोज.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!