मुंबई : प्रतिनिधी : शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे सहा खासदार फोडत ऑपरेशन टायगर सक्सेस करणाऱ्या एकनाथ शिंदे यांनी आज ठाकरे पिता पुत्रांचा मोठा शिलेदार फोडला. विधान परिषदेतील आमदार सचिन अहिर यांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करत शिवसेनेकडून विधान परिषदेच्या उपसभापती पदासाठी अर्ज भरला. अहिरांच्या उमेदवारीने पावसाळी अधिवेशनात राजकीय नाट्य घडल्याने सत्ताधारी आणि विरोधकही अवाक झाले. (Sachin Ahir joins the Eknath Shinde faction)
तीन दिवसाचा मराठवाडा, विदर्भ दौरा संपवून उद्धव ठाकरे मुंबईत परतल्यावर एकनाथ शिंदे यांनी त्यांना धक्का दिला आहे. विधान परिषदत उपसभापतीपदासाठी शिवसेना शिंदे गटाकडून सचिन अहिर यांचा उमेदवारी अर्ज भरला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार, मंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते. (Sachin Ahir joins the Eknath Shinde faction)
उप सभापती पदासाठी निलम गोऱ्हे यांचे नाव आघाडीवर होते. यापूर्वी त्या उप सभापतीपदावर होत्या. नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत त्या बिनविरोध निवडून आल्या होत्या. त्यामुळे त्यांची उपसभापतीपदावर वर्णी लागणार अशी दाट शक्यता होती. पण ऐनवेळी शिंदे यांनी ठाकरे यांचा गेम करत पुन्हा धक्का दिला आणि सचिन अहिर यांचा विधान परिषदेच्या उप सभापतीपदासाठी अर्ज भरला. (Sachin Ahir joins the Eknath Shinde faction)