Home » Blog » अखिल भारतीय विद्यापीठ महिला कुस्ती स्पर्धेत तन्वी मगदूमला सुवर्णपदक

अखिल भारतीय विद्यापीठ महिला कुस्ती स्पर्धेत तन्वी मगदूमला सुवर्णपदक

by प्रतिनिधी
0 comments
Tanvi Magdum Wins Gold Medal in Wrestling Competition

कोल्हापूर : प्रतिनिधी :  हरियाणातील कुरुक्षेत्र विद्यापीठ  येथे सुरू असलेल्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ महिला कुस्ती स्पर्धेत शिवाजी विद्यापीठाच्या तन्वी मगदूम हिने ५७ किलो वजन गटात अटीतटीच्या लढतीत सुवर्णपदकपदक पटकावले.  तसेच सृष्टी जयवंत भोसले हिने ६५ किलो वजन गटात ब्राँझ पदक मिळवले. (Tanvi Magdum Wins Gold Medal in Wrestling Competition)

     विजयी खेळाडूंना  शिवाजी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू प्रा. डॉ. सुरेश गोसावी व प्रभारी प्र -कुलगुरू प्रा. डॉ. ज्योती जाधव, कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे आणि क्रीडा संचालक प्रा.डॉ. शरद बनसोडे यांचे प्रोत्साहन लाभले. तसेच संघाचे प्रशिक्षक डॉ विक्रम नागरे पाटील आणि डॉ प्रताप जाधव  यांचे मार्गदर्शन लाभले. (Tanvi Magdum Wins Gold Medal in Wrestling Competition)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00