मुंबई : प्रतिनिधी : सलग तीन दिवस शेअर बाजारात उत्साहाचे वातावरण असताना गुढी पाडव्याला गुरुवारी सेन्सेक्स १६०० हून अंकांनी कोसळला. गुढी पाडव्याच्या शुभमुहुर्तावर शेअर बाजारात आनंदाचे वातावरण राहील ही अटकळ शेअरबाजार सुरू होताच मावळली. काही मिनिटातच गुंतवणूकदारांच्या सात लाख कोटी रुपयांच्या गुंतवणूकीला चांगलाच फटका बसला. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने धोरणात्मक दर अपरिवर्तित ठेवल्याने आणि कच्चा तेलाच्या किंमती प्रति बॅरल ११० डॉलरच्यावर गेल्याने निफ्टी ५० आणि बीएसई सेन्सेक्समध्ये मोठी घसरण झाली. सेन्सेक्स १६०० हून अधिक अंकांनी घसरला. निफ्टी ५० दिवसभरात २३,२०० च्या पातळीखाली गेला. त्यांचा फटका गुंतवणूकदारांना बसला आहे. (The stock market crashed by 1,600 points on Gudi Padwa)
तेलाच्या किंमती प्रतिबॅरल ११० डॉलरच्या वर गेल्या आहेत. होमुर्झच्या सामुद्रधुनी बंद झाल्याने तेलाच्या किंमती वाढल्या आहेत. इराणने कतारच्या उर्जा प्रकल्यावर हल्ले केले आहेत. त्यांचे पडसाद शेअरबाजारात पहायला मिळाले. सकाळी ९ वाजून ५५ मिनिटांनी निफ्टी ५० हजार ५५५ अंकांनी घरुन २३,२२२.९५ अंकावर व्यवहार करत होता. ही घसरण २.३३ इतकी होती. बीएसई सेन्सेक्सही २.३८ टक्क्यांनी घसरला.
तज्ज्ञांच्या मते, इस्त्रायलने इराणमधील जगातील सर्वात मोठ्या एलएनजी रिफायनरीवर हल्ला केल्यामुळे युद्धासंदर्भातील अनिश्चितता वाढली आहे. कच्च्या तेलाच्या बॅरेलची किंमत १११ डॉलर्सपर्यंत वाढली आहे. भारतासारख्या तेल आणि वायू आयातदारांसाठी ही एक वाईट बातमी आहे. ब्रेटची किंमत दीर्घकाळ ११० डॉलरच्यावर राहिली तर भारताच्या आर्थिक स्थितीवर नकारात्मक परिणाम होतील. आर्थिक वर्ष २०२७ मध्ये भारताचा जीडीपी वाढीवर आणि कंपन्यांच्या नफ्यावरही परिणाम होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. (The stock market crashed by 1,600 points on Gudi Padwa)
अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष जेरोम पॉवेल म्हणाले, अपेक्षाप्रमाणे महागाई कमी न झाल्यामुळे मध्यवर्ती बँकेने व्याजदर स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मध्यपूर्वीतील भू राजकीय तणाव आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या बदलत्या शुल्क धोरणांमुळे अनिश्चता आली असल्याचे त्यांनी सांगितले.
एचडीएफसी बँकेतील मोठया विक्रीमुळे बाजारांवर दबाव … एचडीएफसी बँकेचे प्रभारी अध्यक्ष आणि संचालक अतानु चक्रवर्ती यांनी नैतिकेच्या कारणावरुन राजीनामा दिल्याने एचडीएफसी बँकेच्या शेअर्समध्ये जवळपास आठ टक्क्यांनी घसरण झाली आहे. बँकेने असेही सांगितले आहे की भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मंजुरीनंतर माजी सीईओ केकी मेस्त्री आणि प्रभारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. एचडीएफसी बँकेच्या शेअर्सचे मोठे वजन असताना त्याच बँकेचे शेअर्स घसरल्याने सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्हीवर घसरणीचा मोठा दबाव आल्याची शक्यता वर्तवली जात आहे. (The stock market crashed by 1,600 points on Gudi Padwa)