Home » Blog » कोल्हापुरात चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धेचे आयोजन

कोल्हापुरात चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धेचे आयोजन

by प्रतिनिधी
0 comments
Chandrakant Cup Football Tournament Organized

कोल्हापूर : प्रतिनिधी :  बालगोपाल तालीम मंडळ आयोजित व जाधव इंडस्ट्रीज पुरस्कृत “चंद्रकांत चषक -२०२६” फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेला १८ मार्च पासून शाहू स्टेडियम येथे सुरुवात होत आहे. या स्पर्धेतील विजेत्या संघाला २ लाख ३१ हजार रुपये आणि चंद्रकांत चषक, उपविजेत्या संघाला १ लाख ३१ हजार रुपये आणि चंद्रकांत चषक, त्याच बरोबर उपांत्य फेरीत येणाऱ्या संघांना प्रत्येकी ३१ हजार रुपयांचे रोख बक्षीस तसेच स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना वैयक्तिक बक्षिसे देण्यात येणार असल्याची माहिती कोल्हापूर महापालिका परिवहन समितीचे सभापती सत्यजित चंद्रकांत जाधव व राजेंद्र कुरणे यांनी पत्रकार परिषदेत दिली. (Chandrakant Cup Football Tournament Organized)

बालगोपाल तालीम मंडळाच्या आयोजित ही स्पर्धा १८ मार्च ते २९ मार्च या कालावधीत होणार आहे. स्पर्धेचे उद्घाटन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष, आमदार राजेश क्षीरसागर, माजी आमदार व विफाचे उपाध्यक्ष मालोजीराजे छत्रपती यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार यांच्या हस्ते बुधवारी दुपारी साडेतीन वाजता होणार आहे.  आहे. यावेळी माजी खासदार संजय मंडलिक, माजी आमदार व शिवसेनेच्या उपनेत्या जयश्री चंद्रकांत जाधव, महापौर रूपाराणी निकम, उपमहापौर अक्षय जरग, स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, महिला बालकल्याण समिती सभापती कौसर बागवान, शिवसेनेचे गटनेते शारंगधर देशमुख, शिवसेनेचे समन्वयक सत्यजित कदम, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, स्थायी समितीचे माजी सभापती संभाजी जाधव, जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण लोंढे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. (Chandrakant Cup Football Tournament Organized)

 स्पर्धेच्या निमित्ताने मैदानावर दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव (आण्णा) यांचे भव्य पोस्टर उभारण्यात येणार आहे. तसेच शहराच्या विविध भागात मोक्याच्या ठिकाणी वरिष्ठ १६ संघातील खेळाडूंची प्रतिमा असणारे बॅनर लावण्यात येणार आहेत.स्पर्धेतील उत्कृष्ट गोलकीपर, उत्कृष्ट डिफेन्स, उत्कृष्ट हाफ व उत्कृष्ट फॉरवर्ड या चार खेळाडूंना आकर्षक भेटवस्तू आणि गौरव चिन्ह, तर स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूला ३१ हजार रुपये, गौरव चिन्ह आणि भेटवस्तू देऊन गौरवले जाणार आहे. प्रत्येक सामन्यातील मॅन ऑफ द मॅचचा बहुमान मिळवणाऱ्या खेळाडूला ३१०० रूपये बक्षिस देण्यात येणार आहे.यावेळी उपाध्यक्ष निवास शिंदे, सेक्रेटरी राहुल चव्हाण, जॉईन सेक्रेटरी आप्पासाहेब साळोखे, युवराज कुरणे, रोहन शिंदे, सुदेश मगदूम, सुनील पोवार, कपिल मोहिते, अनिकेत सावंत आदी उपस्थित होते. (Chandrakant Cup Football Tournament Organized)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00