Home » Blog » विधान भवनात बॉम्ब ठेवल्याची अफवा

विधान भवनात बॉम्ब ठेवल्याची अफवा

by प्रतिनिधी
0 comments
Rumors of a bomb being planted in Vidhan Bhavan

मुंबई : प्रतिनिधी : विधानभवनात बॉम्ब ठेवल्याची धमकी देणारा ईमेल आल्यानंतर खळबळ उडाली. बॉम्बशोधक पथकाने विधानभवन आणि परिसराची कसून तपासणी केली. सध्या विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असल्याने अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यात आला. तपासणीनंतर बाँब ठेवल्याची अफवा होती स्पष्ट झाले. सध्या विधीमंडळाचे काम सुरळीत झाले आहे. (Rumors of a bomb being planted in Vidhan Bhavan)

विधीमंडळात आज सकाळी नऊ वाजता मंत्री, अधिकारी आणि कर्मचारी दाखल झाले. पण त्यांना गेटवर रोखण्यात आले. त्यावेळी विधानसभवानात बॉम्ब ठेवल्याचा ई मेल आल्याने पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी परिसराचा ताबा घेऊन विधीमंडळ परिसरात बॉम्बशोधक पथक दाखल झाले. त्यांनी तपासणी केल्यानंतर कोणतीही वस्तू सापडली नाही. त्यानंतर विधीमंडळाच्या कामकाजाला सुरूवात झाली. दरम्यान विधानभवानासह चार ठिकाणी बॉम्ब स्फोटाची धमकी देणारा ई मेल आला असल्याची माहिती विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी दिली. आज सकाळी ६.५७ वाजता सीपीएल मेलवर धमकीचा मेला आला. त्यामध्ये चार ठिकाणे बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली होती. विधानभवन, स्टॉक एक्सचेंज, मेट्रो स्टेशन, मुंबई हायकोर्ट या चार ठिकाणी बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी देण्यात आली होती. (Rumors of a bomb being planted in Vidhan Bhavan)

दरम्यान विधानभवानची तपासणी पूर्ण झाल्यावर घाबरण्याचे कारण नसल्याचे गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. विधान भवनाची एक तास तपासणी केली असता कुठेही काहीही सापडले नसल्याच त्यांनी सांगितले. विधानभवानातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घाबरु नये असे त्यांनी सांगितले.

दरम्यान या घटनेवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर उपरोधीक टीका केली. महाराष्ट्राला सक्षम गृहमंत्री लाभलेले आहेत. त्यामुळे बॉम्ब ठेवण्याचे धाडस कोणीही करणार नाही असे म्हणत ही अफवाच ठरावी असेही ते म्हणाले. (Rumors of a bomb being planted in Vidhan Bhavan)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00