Home » Blog » ज्येष्ठ समीक्षक चंद्रकांत पाटील मराठी साहित्याच्या पिकाचे राखणदार – डॉ.राजन गवस

ज्येष्ठ समीक्षक चंद्रकांत पाटील मराठी साहित्याच्या पिकाचे राखणदार – डॉ.राजन गवस

by प्रतिनिधी
0 comments
Award presented to senior critic Chandrakant Patil

कोल्हापूर : प्रतिनिधी : ज्येष्ठ समीक्षक चंद्रकांत पाटील मराठी साहित्याच्या पिकाचे राखणदार, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ.राजन गवस यांनी आज येथे केले. शिवाजी विद्यापीठाच्या मानव्यशास्त्र सभागृहामध्ये आयोजित करण्यात आलेल्या डॉ.म.सु.पाटील समीक्षा पुरस्कार, २०२६ चे आयोजन करण्यात आले होते. समारंभाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.विलास शिंदे उपस्थित होते. (Award presented to senior critic Chandrakant Patil)

डॉ. राजेंद्र गवस म्हणाले, खेडयापाडयातील लिहित्या मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचे काम चंद्रकांत पाटील यांनी केले. अफाट वाचनामुळे साहित्याविषयीची त्यांची भूमिका पक्की होती.

पुरस्कारास उत्तर देताना ज्येष्ठ समीक्षक चंद्रकांत पाटील म्हणाले, माणसांवर प्रेम करणाऱ्या समीक्षक म.सु.पाटील यांच्या नांवे दिला जाणारा पुरस्कार मला मिळणे हे गौरवास्पद आहे. नव्याने लिहिणाऱ्यांनी आपला आत्मा गहाण न टाकता समग्र अवकाशाविषयी जागरूकतेने लिहिले पाहिजे.

अध्यक्षीय मनोगतामध्ये कुलसचिव डॉ.विलास शिंदे म्हणाले, पुस्तक परीक्षणाच्या पातळीवरील समीक्षेपेक्षा सैधांतिक पातळीवरील पातळीची समीक्षा चंद्रकांत पाटील यांची आहे. . (Award presented to senior critic Chandrakant Patil)

या पुरस्कार वितरण सोहळयाचे प्रास्ताविक मराठी अधिविभागप्रमुख डॉ.रणधीर शिंदे यांनी केले. मानपत्राचे वाचन डॉ.नंदकुमार मोरे यांनी केले. आभार डॉ.सुखदेव एकल यांनी मानले तर सुत्रसंचालन प्रांजली क्षीरसागर यांनी मानले. या कार्यक्रमासाठी डॉ. दिलीप धोंडगे, प्रा.प्रवीण बांदेकर, कृष्णात खोत, डॉ.एकनाथ पगार, आशुतोष पाटील, विरधवल परब, डॉ.अवनिश पाटील, डॉ.मेघा पानसरे, गौतमी पुत्रकांबळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. (Award presented to senior critic Chandrakant Patil)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00