Home » Blog » भिवंडी महापौरपदी नारायण चौधरी विजयी; भाजपला धक्का

भिवंडी महापौरपदी नारायण चौधरी विजयी; भाजपला धक्का

by प्रतिनिधी
0 comments
Narayan Chaudhary as Bhiwandi Mayor

मुंबई : प्रतिनिधी : भिवंडी महानगरपालिकेच्या महापौरपदी नारायण चौधरी यांनी विजय मिळवला आहे. चौधरी यांना महापौरपदासाठी ४८ मते मिळाली. ते भाजपमधून काँग्रेस आणि सेक्युलर फ्रंटमध्ये सहभागी झाले होते. चौधरी यांच्या विजयाने भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजपच्या महापौरपदाच्या अधिकृत उमेदवार स्नेहा पाटील यांना अवघी १६ मते मिळाली आहे. शिवसेनेच्या नगरसेवकांनी भाजप विरोधात कोणार्क विकास परिषदेच्या विलास पाटील यांना मतदान केले. (Narayan Chaudhary as Bhiwandi Mayor)

भिवंडी महापौरपदी कोण बसणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. महापौरपदासाठी दहा जणांनी अर्ज भरले होते. त्यापैकी सहा उमेदवारांनी माघार घेतल्याने चार उमेदवार महापौरपदाच्या रिंगणात राहिले. काँग्रेस सेक्युलर आघाडीकडून भाजपचे बंडखोर नारायण चौधरी, भाजपच्या स्नेहा पाटील आणि कोनार्क विकास आघाडीचे विलास पाटील हे प्रमुख उमेदवार होते. पण निवडणुकीपूर्वी पोलिसांनी एका गुन्ह्यात विलास पाटील यांना अटक केली होती. महापौर निवडीसाठी विलास पाटील पोलिस बंदोबस्तात महानगरपालिकेत दाखल झाले होते. (Narayan Chaudhary as Bhiwandi Mayor)

भिवंडी महानगरपालिकेत ९० सदस्य संख्या असलेल्या सभागृहात काँग्रेसचे ३०, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे १२ असे ४२ सदस्य होते. भाजपचे नारायण चौधरी हे नऊ नगरसेवकांसह काँग्रेसमध्ये दाखल झाले. काँग्रेस आणि सेक्युलर फ्रंटकडून नारायण चौधरी यांना महापौरपदाची उमेदवारी दिली. चौधरी यांनी भाजपच्या उमेदवार स्नेहा पाटील यांचा पराभव केला. या निवडणुकीत भाजप, काँग्रेसची मतेही फुटली. (Narayan Chaudhary as Bhiwandi Mayor)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00