Home » Blog » फुटबॉल खेळताना खासदारांचे निधन

फुटबॉल खेळताना खासदारांचे निधन

by प्रतिनिधी
0 comments
MP dies while playing football

शिलाँग : मेघालय राज्यातील लोकसभा खासदार आणि व्हॉइस ऑफ द पीपल पार्टी (व्हीपीपी) नेते रिकी अँड्र्यू जे. सिंगकॉन यांचे गुरुवारी (दि.१९) सायंकाळी  शिलाँगमध्ये फुटबॉल खेळताना अचानक निधन झाले. गुरुवारी रात्री पावनेनऊ वाजता त्यांच्या मृत्यूची घोषणा डॉक्टरांनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहूल गांधी यांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.  

मावलाई माविओंग येथे एका मैत्रीपूर्ण फुटबॉल सामन्यात खासदार सिंगकॉन सहभागी झाले होते. सामना सुरू असताना अचानक ते मैदानावर कोसळले. मैदानावर प्राथमिक उपचार करण्यासाठी मेडिकल सपोर्टने मैदानावर धाव घेतली. त्यानंतर कम्युनिटी हेल्थ सेंटरमध्ये हलवले. पण त्यांची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना जयाव येथील डॉ. एच. गॉर्डन रॉबर्ट्स हॉस्पिटलमध्ये हलवले. डॉक्टरांनी तातडीने त्यांच्यावर उपचार सुरू केले. उपचार सुरू असतानाच त्यांचे निधन झाले. (MP dies while playing football)

त्यांच्या निधनाची बातमी कळताच, उपमुख्यमंत्री प्रेस्टोन टायनसॉन्ग, व्हीपीपी अध्यक्ष आर्डेंट मिलर बसैवमोइट, अनेक आमदार, वरिष्ठ राजकीय नेते आणि पक्ष कार्यकर्ते हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. मेघालयचे मुख्यमंत्री कॉनराड संगमा यांनी सिंगकॉन यांच्या अकाली निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले. (MP dies while playing football)

प्रथमच खासदार झालेले सिंगकॉन २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर एक प्रमुख राजकीय व्यक्ती म्हणून उदयास आले होते.व्हीपीपीच्या तिकिटावर निवडणूक लढवताना त्यांनी तीन वेळा काँग्रेसचे खासदार राहिलेले विन्सेंट एच. पाला यांचा ३.७ लाखांहून अधिक मतांनी पराभव केला, ज्यामुळे मेघालयाच्या राजकीय परिस्थितीत मोठा बदल झाला. स्थानिकांच्या हक्कांसाठी तळागाळातील संपर्क आणि वकिलीसाठी ओळखले जात होते. (MP dies while playing football)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00