Home » Blog » कोल्हापुरात स्वीकृत नगरसेवकांच्या नावावर शिक्कामोर्तब

कोल्हापुरात स्वीकृत नगरसेवकांच्या नावावर शिक्कामोर्तब

by प्रतिनिधी
0 comments
Seal on the names of approved corporators in Kolhapur

कोल्हापूर : प्रतिनिधी : कोल्हापूर महानगरपालिकेत स्वीकृत नगरसेवकांच्या नावांवर शिक्कामोर्तब झाले आहे. काँग्रेस आघाडी आणि महायुतीकडून आठ अर्ज दाखल केले आहेत. त्यामध्ये काँग्रेस आणि भाजकडून प्रत्येकी तीन तर शिवसेनेकडून दोन अर्ज दाखल करण्यात आले. २० फेब्रुवारी रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत स्वीकृत नगरसेवकांच्या नावाची घोषणा होणार आहे. (Seal on the names of approved corporators in Kolhapur)

भाजप शिवसेना महायुतीकडून स्वीकृत नगरसेवकपदासाठी अर्ज भरण्यात आले. भाजपकडून प्रा. जयंत पाटील, महानगर अध्यक्ष विजय जाधव आणि सुनील वाडकर यांनी अर्ज भरले आहेत. प्रा. जयंत पाटील हे यापूर्वी झालेल्या सभागृहात स्वीकृत नगरसेवक म्हणून काम पाहिले. महानगरपालिकेत कारभारी म्हणून त्यांची ओळख ठळक आहे. भाजपचे महानगर अध्यक्ष विजय जाधव यांनी पक्षाच्या आदेशानुसार महानगरपालिकेची निवडणूक लढवली नव्हती. पक्षाने जाधव यांना संधी देऊन निष्ठावंताला संधी दिली आहे. सुनील वाडकर हे उपनगराचे प्रतिनिधीत्व करणार आहेत. (Seal on the names of approved corporators in Kolhapur)

शिवसेनेकडून माजी नगरसेवक रत्नेश शिरोळकर आणि प्रसाद चव्हाण यांना संधी दिली आहे. शिरोळकर हे माजी नगरसेवक असून ते आमदार राजेश क्षीरसागर यांचे समर्थक आहेत. प्रसाद चव्हाण हे जिल्हा प्रमुख सुजीत चव्हाण यांचा मुलगा आहे. ते महानगरपालिकेचे निवडणूक लढवणार होते. पण त्यांनी निवडणूकीत माघार घेतली. त्याबद्दल पक्षाने त्यांना स्वीकृत नगरसेवक पदावर संधी दिली आहे. (Seal on the names of approved corporators in Kolhapur)

 कोल्हापूर महानगरपालिकेत काँग्रेस पक्षाकडून माजी नगसेवक राहूल माने, शिवसेनेचे माजी शहरप्रमुख सुनील मोदी आणि मुस्ताक मलबारी यांचे अर्ज दाखल झाले. सुनील मोदी यांनी निवडणूक लढवली नसल्याने निवडणुकीपूर्वीच शिवसेनेला स्वीकृत नगरसेवकपद देण्याचे ठरले होते. त्यानुसार सतेज पाटील यांनी मोदी यांना पसंती दिली आहे. मोदी शिवसेनेत असले तरी सतेज पाटील गटाचे समजले जातात. माजी नगरसेवक राहूल माने हे शिवसेनेच्या शारंगधर देशमुख यांच्याकडून पराभूत झाले होते. त्यांना काँग्रेसने स्वीकृत नगरसेवकपदी संधी दिली आहे. नवीन चेहरा आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीत मदत झालेल्या मुस्ताक मलबारी यांना संधी दिली आहे. ते अल्पसंख्याक समाजाचे प्रतिनिधीत्व करणार आहेत. (Seal on the names of approved corporators in Kolhapur)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00