Home » Blog » राहूल नार्वेकरांशी जमिन मोजणीवरुन वाद

राहूल नार्वेकरांशी जमिन मोजणीवरुन वाद

by प्रतिनिधी
0 comments
Dispute with Rahul Narvekar over land measurement

मुंबई : प्रतिनिधी : रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यात जमिन मोजणीवरुन राहूल नार्वेकरांचा एका कुटुंबाशी झालेल्या वादाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. कुटुंबाच्या अनुपस्थितीत जमिन मोजणी केल्याबददल नार्वेकर आणि त्यांच्यासोबत असलेल्या लोकांना एक दांपत्य जाब विचारत असल्याचे दिसत आहे.

अलिबाग तालुक्यातील म्हात्रोळी येथील गावातील जागेच्या वादाचा व्हिडिओ दोन दिवसापूर्वी व्हायरल झाला आहे. त्यामध्ये नार्वेकर यांच्यासमवेत आलेल्या लोकांसोबत एका कुटुंबाचा वाद चालला दिसत आहे. जमिनीचे मालक एका कार्यक्रमासाठी बाहेर गेले असताना जमिनीची मोजणी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामध्ये कुटुंबप्रमुख ‘चुकी तुमची आहे’ असे नार्वेकरांसमवेत आलेल्या लोकांना सुनावत आहेत. (Dispute with Rahul Narvekar over land measurement)

‘साखरपुडा असतानाही घरात का आलास? आमच्या घरात का शिरलास?’ असा जाब विचारत आहेत.  तसेच एकाला मारहाण केल्याचे दिसून येते. नार्वेकर त्या कुटुंबाची समजूत काढण्याचा प्रयत्न करत असताना संबधित दांपत्य त्यांनाच खडसावत असल्याचे दिसून येत आहे.

या व्हिडिओवरुन राज्यात चांगलीच खळबड उडाली आहे. शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनीही टीका केली आहे. कोकणातील जमिनीला मोठा भाव आला असून राजकारणी लोक गुजराती धनदांडग्यांच्या घशात जमिनी घालत आहेत, असा आरोप केला आहे. (Dispute with Rahul Narvekar over land measurement)

दरम्यान या घटनेवर राहूल नार्वेकरांनी व्हिडिओबाबत स्पष्टीकरण दिले आहे. दोन दिवसापूर्वी शेतजमिनीच्या रस्त्यांवर जात असताना दोन शेतकऱ्यामध्ये वाद असल्याचे माझ्या निदर्शनास आले. त्यावेळी मी फक्त त्यांना शांतपणे वाद मिटवण्याचा सल्ला दिला आणि मी माझ्या कामानिमित्त पुढे निघून गेले. या वादाशी आणि घटनेची माझा संबध नसल्याचे नार्वेकरांनी खुलासा केला आहे. (Dispute with Rahul Narvekar over land measurement)

दरम्यान वाद घालणारी व्यक्तीच्या शेजारी नार्वेकरांच्या नातेवाईकांची जमीन असल्याचे बोलले जात आहेत. जमिन मोजणीच्यावेळी ते उपस्थित होत असे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00