Home » Blog » गोळीबार प्रकरणी  अभिनेता कमाल खानला अटक

गोळीबार प्रकरणी  अभिनेता कमाल खानला अटक

by प्रतिनिधी
0 comments
Actor Kamaal Khan arrested

मुंबई  : प्रतिनिधी :  विविध कारणामुळे नेहमी वादाच्या भोवऱ्यात राहणाऱ्या अभिनेता कमाल खान (केआरके) याला ओशिवारा पोलिसांनी अटक केली आहे. १८ जानेवारीला त्याने राहत्या फ्लॅटमधून आपल्या रिव्हॉल्वरमधून निवासी इमारतीवर दोन गोळ्या झाडल्याच्या कारणावरून त्याच्यावर कारवाई करीत त्याची रिव्हॉल्वर जप्त केली आहे. (Actor Kamaal Khan arrested)

 केआरकेने १८ जानेवारी रात्री अंधेरी पश्चिमेकडील लोखंडवाला येथील नालंदा सोसायटीमध्ये दोन गोळ्या झाडल्या गेल्या, त्याच्या आवाजाने परिसरात काहीकाळ घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तपासात त्या इमारतीच्या दुसऱ्या आणि चौथ्या मजल्यावर पुंगळ्या सापडल्या. फॉरेन्सिक लॅबमध्ये त्याची पडताळणी केल्यानंतर त्या केआरकेच्या बंगल्याच्या परिसरातून झाडल्याचे स्पष्ट झाले. त्याबाबत शुक्रवारी रात्री केकेआरला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने रिव्हॉल्वर तपासण्यासाठी घराजवळच्या खारफुटीच्या दिशेने फायरिंग केले असल्याची कबुली दिली. मात्र सोसाट्याच्या वाऱ्यामुळे गोळ्यांचा मार्ग बदलून त्या निवासी इमारतीवर लागल्याचा दावा त्याने केला. पोलिसांनी त्याला अटक करून परवानाधारक बंदूक जप्त केली. आज न्यायालयात हजर केले असता केआरकेला २७ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी मिळाली. (Actor Kamaal Khan arrested)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00