Home » Blog » महापौरपदासाठी आरक्षण सोडत गुरुवारी; २९ महापौरांचे होणार चित्र स्पष्ट

महापौरपदासाठी आरक्षण सोडत गुरुवारी; २९ महापौरांचे होणार चित्र स्पष्ट

by प्रतिनिधी
0 comments
Reservation draw for the mayoral post

मुंबई : प्रतिनिधी :  राज्यातील २९ महानगरपालिकेतील महापौर पदाची सोडत गुरुवारी २२ जानेवारी  रोजी होणार आहे. २९ महानगरपालिकेत आरक्षणपदाच्या सोडतीत लॉटरी कोणाला लागणार हे स्पष्ट होणार आहे. आरक्षणानंतर महापौरपद निवडणुकीच्या घडामोडीला वेग येणार असून ३१ जानेवारीपर्यंत सर्वच महानगरपालिकेत महापौर विराजममान होण्याची शक्यता आहे.

महानगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून २९ पैकी २२ महानगरपालिकेत महायुतीची सत्ता आली आहे. महायुतीतील भाजप आणि शिवसेना या पक्षांमध्ये आपल्याच पक्षाचा महापौर बसावा यासाठी स्पर्धा सुरू झाली आहे. महापौरपदी पुरुष की महिला, कोणत्या प्रवर्गासाठी महापौरपद आरक्षण राहणार हे गुरुवारी स्पष्ट होणार आहे. (Reservation draw for the mayoral post)

नगरविकास विभागाने महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत गुरुवारी २२ रोजी मंत्रालयाच्या सहाव्या माजल्यावर नगरविकास विभागाच्या कार्यालयात सकाळी ११ वाजता होणार आहे. चक्राकार पद्धतीने आरक्षण होणार आहे. यापूर्वी महापौरपदासाठी असलेले आरक्षण वगळून नवीन आरक्षण पडणार असल्याने सर्वांची उत्सुकता लागली आहे. मुंबई महानगरपालिकेत भाजप शिवसेना युतीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. पण शिवसेनेने २९ नगरसेवकांना हॉटेलमध्ये ठेवल्याने एकनाथ शिंदे काय करणार असा प्रश्न विचारला जात आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची १०० वी जयंती असल्याने महापौरपद शिवसेनेला अडीच वर्षे मिळाले अशी इच्छा एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केल्याची चर्चा आहे. भाजपच्या ८९ जागांवर विजय मिळवला असल्याने मुंबई महानगरपालिकेवर भाजपचाच महापौर असावा असा दावा पक्षाने केला आहे. आरक्षण सोडतीनंतर राज्यातील महापौरपदाचे चित्र स्पष्ट होणार आहे. (Reservation draw for the mayoral post)

You may also like

error: Content is protected !!