Home » Blog » महायुतीचं ठरलं..भाजप थोरलं, शिवसेना मधलं, राष्ट्रवादी धाकलं

महायुतीचं ठरलं..भाजप थोरलं, शिवसेना मधलं, राष्ट्रवादी धाकलं

by प्रतिनिधी
0 comments
The seat-sharing agreement for the grand alliance has been finalized

कोल्हापूर : प्रतिनिधी : तीन मंत्री, खासदार, आमदार, पदाधिकाऱ्यांच्या गेल्या अनेक दिवसापासून सुरू असलेल्या मॅरेथॉन बैठकीनंतर अखेर महायुतीचं जागावाटपाचे ठरलं आहे. कोल्हापुरात सर्वात मोठा भाऊ भाजप ठरला असून ८१ पैकी ३६ जागा लढवणार आहे. शिवसेना ३० जागांवर तर राष्ट्रवादी काँग्रेसला १५ जागांवर समाधान मानावे लागले आहे. जागा वाटप ठरलं असलं तरी उमेदवारांची यादी मंगळवारी सकाळी जाहीर केली जाणार आहे. उद्या मंगळवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असू दुपारी दोन वाजेपर्यंत अर्ज भरण्याची मुदत आहे.

मुश्रीफांचा सतेज पाटलांना टोला

पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, आमदार अमल महाडिक यांच्या प्रमुख उपस्थितीत महायुतीची घोषणा पत्रकार परिषदेत करण्यात आली. महायुतीचे ८१ उमेदवार निवडून आणण्यासाठी हाडाची काडं आणि रक्ताचे पाणी करु असा विश्वास मंत्री मुश्रीफ यांनी केला. विरोधकांवर टीका करताना केंद्रात आणि राज्यात महायुतीची सत्ता असताना विरोधक कसा निधी आणणार असा सवालही त्यांनी केला. लाडक्या बहिणींना २१०० रुपये देण्याचे वचन आम्ही पूर्ण करणार असल्याचे ते म्हणाले. क्रॉस वोटिंग झाला तर राजीनामा घेणार. पण लोकशाहीत असं करता येणार नाही हे माझ्या मित्राला माहित नाही असा टोलाही त्यांनी सतेज पाटील यांना मारला. (The seat-sharing agreement for the Mahayuti alliance has been finalized in Kolhapur)

विरोधकांकडे मंत्री, आमदार नसताना विकास कसा होणार?

खासदार महाडिक यांनी आम्ही जास्तीत जास्त कार्यकर्त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे असे सांगून मंगळवारी सकाळी यादी जाहीर करणार असल्याचे सांगितले. ज्यांना उमेदवारी मिळाली नाही त्याबाबत महाडिक यांनी दिलगिरी व्यक्त केली. आमच्या पक्षाचा जाहीरनामा अपेक्षा पूर्ण करणार असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आमच्या विरोधकांनी कोल्हापूर कस्सं, तुम्ही म्हणशीला तस्स अशी टॅगलाईन केली आहे. मात्र कोल्हापूर कसं, पाण्याची बोंब, रस्त्याची बोंब असे आम्ही करणार नाही असा टोलाही त्यांनी मारल. विरोधकांकडे आमदार नाहीत, मंत्री नाहीत, मग तुम्ही विकास कसा करणार असा सवालही त्यांनी केला. कोल्हापूर शहराला कुठेही निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितले. (The seat-sharing agreement for the Mahayuti alliance has been finalized in Kolhapur)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00