Home » Blog » धनंजय मुंडे, नवाब मलिक राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक

धनंजय मुंडे, नवाब मलिक राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक

by प्रतिनिधी
0 comments
NCP's Malik and Munde are star campaigners

मुंबई : प्रतिनिधी :  राज्यातील २९ महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने ४० स्टार प्रचारकांची यादी गुरुवारी जाहीर केली आहे. पक्षाचे सर्वेसर्वा, उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष  खासदार सुनील तटकरे यांच्यासह भाजपाने विरोध केलेल्या माजी मंत्री नवाब मलिक, धनंजय मुंडे यांचाही समावेश आहे. सदनिका अपहार प्रकरणात शिक्षा सुनावलेल्या माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांना मात्र त्यामध्ये स्थान देण्यात आलेले नाही. (NCP’s Malik and Munde are star campaigners)

प्रदेशाध्यक्ष तटकरे यांनी जाहीर केलेल्या या यादीमध्ये त्यांच्यासह  उपमुख्यमंत्री  पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, माजी मंत्री धनंजय मुंडे, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, कृषीमंत्री दत्तात्रय भरणे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे, पर्यटन राज्यमंत्री इंद्रनील नाईक, माजी मंत्री धर्मरावबाबा आत्राम, माजी मंत्री अनिल भाईदास पाटील, माजी मंत्री संजय बनसोडे, आमदार प्रतापराव चिखलीकर पाटील, ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक, सयाजी शिंदे, अल्पसंख्याक महामंडळाचे अध्यक्ष मुश्ताक अंतुले, माजी खासदार समीर भुजबळ, आमदार अमोल मिटकरी, आमदार सना मलिक-शेख, महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, आमदार इद्रीस नायकवडी, माजी आमदार  अनिकेत तटकरे, झिशान सिद्दीकी,  राजेंद्र जैन, शरद पाटील, मुंबई कार्याध्यक्ष सिध्दार्थ कांबळे, प्रदेश सरचिटणीस सुरज चव्हाण, लहू कानडे, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे,  सुनिल मगरे, अल्पसंख्याक सेलचे प्रदेशाध्यक्ष नाझेर काझी, प्रदेश प्रवक्ते महेश शिंदे, श्रीमती राजलक्ष्मी भोसले, ज्येष्ठ नेत्या सुरेखा ठाकरे, अल्पसंख्याक सेलचे प्रमुख नेते नजीब मुल्ला,  प्रतिभा शिंदे,  आदींचा समावेश आहे. (NCP’s Malik and Munde are star campaigners)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00