Home » Blog » होय, अजित दादांचा फोन आला होता, पण पुण्यासाठी…

होय, अजित दादांचा फोन आला होता, पण पुण्यासाठी…

by प्रतिनिधी
0 comments
Ajit Pawar calls Satej Patil

कोल्हापूर : प्रतिनिधी : होय, अजित दादांचा मला फोन आला होता, पण पुण्यासाठी प्रस्ताव आला होता. त्याचा कोल्हापूर आणि इचलकरंजी महानगरपालिकेशी काही संबध नाही, असा खुलासा विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते सतेज पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केला. आमचा ए प्लॅन हा महाविकास आघाडी असून त्यावर आमचं काम जवळजवळ पूर्ण झाल्याचा दावाही त्यांनी केला. कोल्हापूर आणि इचलकरंजीतील अंतिम यादी एक जानेवारीला जाहीर होईल, असेही त्यांनी सांगितले. (Ajit Pawar calls Satej Patil)

जिल्हा काँग्रेस कमिटीत काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यासाठी नागरिकांच्या सूचना मागवल्या आहेत. त्यासाठी खासदार शाहू छत्रपती, आमदार सतेज पाटील, माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते ‘कोल्हापूर कस्सं, तुम्ही म्हणशीला तस्सं…!’ ही टॅगलाईन् प्रसिद्ध करण्यात आली आहे. या कॅम्पेनच्या माध्यमातून कोल्हापूरकरांच्या सूचना जाणून घेतल्या जाणार आहेत. तसेच पुढच्या सात दिवसात लोकांना अपेक्षित असणाऱ्या गोष्टी लक्षात घेवून काँग्रेसचा जाहीरनामा तयार केला जाणार असल्याचे सतेज पाटील यांनी सांगितले. त्यासाठी विशेष क्यूआर कोड लाँच करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले आहे. (Ajit Pawar calls Satej Patil)

अजित पवारांचा सतेज पाटील यांना फोन, पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार अशा बातम्यांनी खळबळ उडाली असताना आमदार सतेज पाटील यांनी खुलासा केला. पुणे महानगरपालिका निवडणुकीबाबत राज्याचे उप मुख्यमंत्री अजित पवार यांचा फोन आला होता अशी माहिती त्यांनी दिली. फॉर्म भरण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत राज्यात आघाड्या आकाराला येतील. पण काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार, शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष, डावे पक्ष, आम आदमी पक्ष या महाविकास आघाडीचा आमचा ए प्लॅन असून त्यावर आमचे काम जवळजवळ पूर्ण झाल्याचे सांगितले. (Ajit Pawar calls Satej Patil)

अजित पवारांच्याबरोबर फक्त पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या प्रस्तावावर चर्चा झाली होती. त्यासंबधी राज्यातील प्रमुख नेत्यांनाही याबाबत कळवले आहे. त्यांचाही काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांबरोबर संपर्क झाला आहे. पण ही चर्चा फक्त पुण्याबाबत होती. कोल्हापूर आणि इचलकरंजी महानगरपालिका निवडणुकीशी काही संबध नाही. कोल्हापूर आणि इचलकरंजीमध्ये महाविकास आघाडी लढणार आहे. आमचा ए प्लॅन तयार आहे. तो जवळजवळ पूर्ण झाला आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे संपर्क नेते अरुण दूधवडकर यांच्याशी आज किंवा उद्या चर्चा होणार असून जागा फायनल होती. ‘आप’ बरोबर माझी चर्चा झाली आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षालाही आम्ही विनंती केली आहे. एक जानेवारीला अंतिम यादी निश्चित होईल असेही त्यांनी सांगितले.  

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00