Home » Blog » ज्येष्ठ पत्रकार विलास झुंजार यांचे निधन

ज्येष्ठ पत्रकार विलास झुंजार यांचे निधन

by प्रतिनिधी
0 comments
Senior journalist Vilas Zhunjar passes away

कोल्हापूर : प्रतिनिधी : ज्येष्ठ पत्रकार विलास शंकरराव झुंजार यांचे (वय १००) रविवारी १४ डिसेंबर रोजी सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील सोळशी गावी निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगी, पुतणे, जावई, नातवंडे, तीन बहिणी असा परिवार आहे. (Senior journalist Vilas Zhunjar passes away)

विलासराव झुंजार यांनी दैनिक समाजमधून पत्रकारितेस सुरुवात केली होती. दैनिक पुढारी, दै. तरुण भारत, महाराष्ट्र टाईम्समध्ये त्यांनी पत्रकारी केली. अन्यायाला वाचा फोडण्याचे आणि सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम झुंजार यांनी केले होते. स्वाभिमानी पत्रकार म्हणून त्यांच् ओळख होती. पत्रकार परिषदेत निडरपणे भिडायचे आणि प्रश्न विचारायचे. कुणाची भीडभाड ठेवायची नाही.  महाराष्ट्र टाइम्सची स्थापना झाल्यानंतर कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी म्हणून ते ४० वर्षे कार्यरत होते. त्यांनी कोल्हापूर शहरात फेरीवाल्यांनी केलेल्या अतिक्रमणाच्या विरोधात बातमी लिहिल्यावर फेरीवाला संघटनेने त्यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली होती. त्या अंत्ययात्रेतही रिपोर्टिंग करण्यासाठी ते सहभागी झाले होते. वयाच्या ८० वर्षीही ते फिल्डवर जाऊन पत्रकारिता करायचे. त्यांचे सर्व राजकीय पक्षांशी मित्रत्वाचे संबध होते. त्यांनी ‘कोल्हापूरच्या पत्रकारितेचा इतिहास’ आणि ‘झुंजार लेखणी’ ही दोन पुस्तके लिहीली आहेत. महाराष्ट्र टाइम्सच् संपादक भारतकुमार राऊत आणि तत्कालिन आरोग्यमंत्री दिग्विजय खानविलकर यांच्या हस्ते पुस्तकांचे प्रकाशन झाले होते. (Senior journalist Vilas Zhunjar passes away)

 वीस फेब्रुवारी २०२५ रोजी त्यांनी शंभराव्या वर्षात पदार्पण केले होते. पत्रकारितेतील योगदानाबद्दल कोल्हापूर प्रेस क्लबच्यावतीने १०० व्या वाढदिवसादिवशी प्रेस क्लबचे अध्यक्ष शितल धनवडे यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला होता. (Senior journalist Vilas Zhunjar passes away)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00