कोल्हापूर : प्रतिनिधी : शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) पेपर फुटीचा पर्दापाश करताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मुख्य आरोपीसह ११ संशयिताना अटक केली. पेपर फोडून कोट्यवधी रुपये गोळा करण्याचा डाव संशयितांचा होता. फोडलेला पेपर देऊन लाखो रुपयांची सुपारी घेण्यासाठी शंभरहून अधिक शिक्षकांशी संशयितांनी संपर्क साधला होता.
टी.ई.टी. परिक्षेचा पेपर परीक्षेपुर्वी देतो असे सांगुन काही विद्यार्थ्यांना बोलावून त्यांचेकडून शैक्षणिक मुळ कागदपत्र व रोख रक्कम स्वीकारुन फसवणूक करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांचे पथकाने मुरगूड पोलीस ठाणेची मदत घेवून २३ नोव्हेंबर रात्री सव्वा एक वाजण्याच्या सुमार कागल तालुक्यातील सोनगे गावात शिवकृपा फर्नीचर मॉलमध्ये छापा टाकून पेपरफुटी रॅकेटचा फर्दाफाश केला. मुरगुड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. (TET exam paper leak racket busted)
मुख्य सुत्रधार गायकवाडला ठोकल्या बेड्या
छाप्याप पोलिसांना सहा संशयित मिळून आले. या गुन्ह्यातील मुख्य सुत्रधार महेश भगवान गायकवाड, (रा सातारा) हा फरारी होता. पोलिसांनी कराड येथे महेश गायकवाडला बेड्या ठोकल्या. रोहीत पांडुरंग सावंत, (३५, रा. कासारपुतळे, ता. राधानगरी, जि. कोल्हापूर), अभिजीत विष्णू पाटील (४०, रा.बोरवडे, ता. कागल, जि. कोल्हापूर), संदिप भगवान गायकवाड (४६, रा. बेलवाडी, ता. कराड, जि. सातारा) अमोल पांडुरंग जरग( ३८ रा. सरवडे, ता. राधानगरी, जि. कोल्हापूर), स्वप्निल शंकर पोवार (३५ रा. कासारपुतळे, ता. राधानगरी, जि. कोल्हापूर), रणधीर तुकाराम शेवाळे, ( रा. सैदापूर, ता. कराड, जि. सातारा), तेजस दिपक मुळीक (२२, रा. निमसोड, ता. कडेगांव, जि. सांगली), प्रणय नवनाथ सुतार (३२ रा. खोजेवाडी, ता. जि. सातारा) , संदिप शिवाजी चव्हाण( ४० रा. कोपर्डे हवेली, ता. कराड, जि. सातारा), श्रीकांत नथुराम चव्हाण (४३ रा. विद्यानगर कराड, ता. कराड, सध्या रा. उंब्रज ता. कराड, जि. सातारा) महेश भगवान गायकवाड, (रा. बेलवाडी, ता. कराड, जि. सातारा) अशी अटक केलल्या संशयितांची नावे आहेत. या गुन्ह्यात मुख्य संशयितांसह एकूण १८ आरोपी अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना २५ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. (TET exam paper leak racket busted)
यांनी केला यशस्वी तपास
पोलीस अधीक्षक योगेशकुमार यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव, संतोष गळवे, मुरगूड पोलीस ठाणेचे सहा. पोलीस निरीक्षक शिवाजी करे, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक अनिल जाधव तसेच पोलीस अमंलदार युवराज पाटील, राजेश राठोड, विनोद चौगुले, प्रदिप पाटील, राजू कोरे, रोहीत मर्दाने, विजय गोसावी, अमित सर्जे, अमित मर्दाने, निवृत्ती माळी, महेश खोत, सागर चौगुले, महेश आंबी, राजेंद्र वरंडेकर, सुशिल पाटील, शिवानंद मठपती तसेच सायबर पोलीस ठाणेचे पोलीस अमंलदार सुरेश राठोड यांनी केली आहे. (TET exam paper leak racket busted)