Home » Blog » Hayden’s powerful century : ऑस्ट्रेलिया, इंग्लंड कसोटी दोन दिवसात खलास…

Hayden’s powerful century : ऑस्ट्रेलिया, इंग्लंड कसोटी दोन दिवसात खलास…

by प्रतिनिधी
0 comments
Hayden's powerful century

पर्थ : ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड संघादरम्यान अ‍ॅशेस मालिकेतील पहिली कसोटी अवघ्या दोन दिवसात खलास झाली. १०० वर्षानंतर दोन्ही देशातील कसोटी दोन दिवसात संपली. १९२१ मध्ये नॉटिंगहॅममध्ये दोन दिवसात कसोटीचा निकाल लागला होता. यजमान ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा ८ गड्यांनी पराभव केला. तीन डावात कसोटीवर गोलंदाजीचा वरचष्मा पहायला मिळाला पण शेवटच्या डावात ऑस्ट्रेलियाच्या ट्रॅव्हिस हेडने धुवाँदार फलंदाजी करत पर्थ कसोटी संघाला जिंकून दिली. १६ चौकार आणि चार षटकार ठोकत हेडने ८३ चेंडूत १२३ धावा कुटल्या. मार्नस लाबुशेंन अर्धशतक झळकावत ५१ धावा केल्या. (Hayden’s powerful century)

कालच्या धावसंख्येत थोडी भर घालत ऑस्ट्रेलियाचा डाव १३२ धावांत आटोपला. इंग्लंडला पहिल्या डावात ४० धावांचे अधिक्य मिळाले. त्यानंतर इंग्लंडचा दुसरा डाव सुरू झाला. सलामीवर झॅक क्रॉलीला मायकेल स्टार्कने शून्यावर बाद केले.  त्यानंतर बेन डकेल आणि ऑली पोपने डाव सावरला. दोघांनी ६५ धावांची भागिदारी केली. स्कॉट बोलॅन्डने जोडी फोडली. डकेटला बोलँडने स्मिथकडे झेल देण्यास भाग पाडले. त्याने २८ धावा केल्या. पोपने ३३ धावा केल्या. त्याचाही बळी बोलॅन्डने घेतला. ज्यो रुटची दांडी मायकेल स्टार्कने उडवत ऑस्ट्रेलियाच्या मार्गातील अडथळा पार केला. त्याने आठ धावा केल्या. हॅरी ब्रुकला भोपळाही फोडता आला नाही तर कर्णधार बेन स्टोक्स २ धावांवर बाद झाला. जेमी स्मिथने १५ धावा केल्या. गस असकिन्स आणि ब्रायडन कारर्सने डाव सावरत संघाला दीडशे धावाच्या पुढे नेले. अटकिन्सला बोलँडने बाद केले. त्याने ३७ धावा केल्या. तर कार्सने २० धावा केल्या. जोफ्रा आर्चरला बाद करत ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा दुसरा डाव १६४ धावांवर रोखला. (Hayden’s powerful century)

विजयासाठी २०४ धावांचे आव्हान देत ऑस्ट्रेलिया संघाची सलामीची जोडी मैदानात उतरली. ट्रॅव्हिस हेड आणि जेक वेदर्ल्ड इंग्लंडच्या गोलंदाजीचा चांगलाच समाचार घेतला. दोघांनी ७५ धावांची सलामी दिली. त्यानंतर ट्रॅव्हिस हेड आणि लाबुशेनने इंग्लंडच्या गोलंदाजीची पिसे काढली. हेडने ८३ चेंडूत शतक ठोकले. ब्रायडन कार्सने हेडला बाद केले. त्यानंतर लॅबुशेन आणि कर्णधार स्टिव्ह स्मिथने ऑस्ट्रेलियाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. (Hayden’s powerful century)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00