Home » Blog » Signs of Ronaldo’s retirement : ख्रिस्तियाने रोनाल्डोकडून निवृत्तीचे संकेत

Signs of Ronaldo’s retirement : ख्रिस्तियाने रोनाल्डोकडून निवृत्तीचे संकेत

by प्रतिनिधी
0 comments
Signs of Ronaldo's retirement

नवी दिल्ली : जगभरात अनेक चाहत्यांच्या गळातील ताईत असलेला पोर्तुगीज फुटबॉल स्टार ख्रिस्तियाने रोनाल्डोने २०२६ चा फिफा विश्वचषक हा त्याचा शेवटचा स्पर्धात्मक सहभाग असेल अशी घोषणा केली. त्याच्या या घोषणेने रोनाल्डो लवकरच निवृत्ती घेईल अशी अटकळ बांधली जात आहे. (Signs of Ronaldo’s retirement)

जेव्हा रोनाल्डोला त्याच्या विश्वचषक निरोपाबद्दल विचारले गेले तेव्हा त्याने उत्तर दिले, “मी ४१ वर्षांचा होणार आहे आणि मला वाटते की तोच तो क्षण असेल, असे सांगून त्याने निवृत्तीचे संकेत दिले आहेत. क्लब आणि देशासाठी ९५० हून अधिक गोल करणाऱ्या या दिग्गज फॉरवर्डने २००२ मध्ये स्पोर्टिंग सीपी येथे आपला व्यावसायिक प्रवास सुरू केला. रोनाल्डोने अलीकडेच सौदी अरेबियाच्या क्लब अल-नासरसोबतचा आपला वास्तव्य २०२७ पर्यंत वाढवला आहे. (Signs of Ronaldo’s retirement)

वयाच्या ४० व्या वर्षीही, तो पुढील वर्षी होणाऱ्या विश्वचषकात भाग घेण्यावर लक्ष केंद्रित करत आहे. त्याच्या पुरस्कारांच्या यादीत फिफा वर्ल्डकप एकमेव प्रमुख ट्रॉफी नाही. वर्ल्डकपबद्दल बोलताना रोनाल्डो म्हणाला, .”या क्षणी मला खूप चांगले वाटते. मी गोल करतो; मला अजूनही जलद आणि धारदार चढाया करतो. मी राष्ट्रीय संघात माझ्या खेळाचा आनंद घेत आहे. पण अर्थातच, प्रामाणिकपणे सांगतो, की लवकरच म्हणजे कदाचित एक किंवा दोन वर्षे फुटबॉल खेळेन. फुटबॉलमधील त्याच्या वारशाचा आणि दशकांच्या प्रवासाचा उल्लेख करताना तो म्हणाला, “. मी गेल्या २५ वर्षांपासून खेळात आहे. मी फुटबॉलसाठी सर्वस्व दिले आहे. अजुनही खेळाचा आनंद घ्यायचा आहे. (Signs of Ronaldo’s retirement)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00