Home » Blog » Nagorao Kumbhar : दाते संस्थेचे ‘भोळे-सुमंत स्मृती पुरस्कार’ जाहीर; प्राचार्य डॉ. नागोराव कुंभार यांना ‘जीवनगौरव’

Nagorao Kumbhar : दाते संस्थेचे ‘भोळे-सुमंत स्मृती पुरस्कार’ जाहीर; प्राचार्य डॉ. नागोराव कुंभार यांना ‘जीवनगौरव’

by प्रतिनिधी
0 comments
Nagorao Kumbhar

लातूर :  प्रतिनिधी : वैचारिक, साहित्यिक आणि सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल वर्धा येथील यशवंतराव दाते स्मृती संस्थेच्या वतीने देण्यात येणारे प्रतिष्ठेचे डॉ. भा.ल. भोळे आणि डॉ. यशवंत सुमंत स्मृती पुरस्कार नुकतेच जाहीर करण्यात आले आहेत. यंदाचा जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ संशोधक, विचारवंत प्राचार्य डॉ. नागोराव कुंभार (लातूर) यांना जाहीर झाला आहे.

पुरस्कार निवड समितीचे प्रमुख निमंत्रक ज्येष्ठ विचारवंत किशोर बेडकिहाळ आणि यशवंतराव दाते संस्थेचे अध्यक्ष प्रदीप दाते यांनी ही माहिती दिली. पुरस्कार वितरण समारंभाची तारीख लवकरच जाहीर केली जाईल. (Nagorao Kumbhar)

मुख्य पुरस्कारांचे मानकरी

भोळे स्मृती वैचारिक साहित्य पुरस्कार दीपक गायकवाड (पुणे) ‘पेरियार -मिथक आणि वास्तव’ या ग्रंथासाठी देण्यात आला.  डॉ. भा.ल. भोळे स्मृती सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार प्रा. वृषाली मगदूम (वाशी-मुंबई) सामाजिक क्षेत्रातील ज्येष्ठ कार्यासाठी देण्यात येणार आहे. डॉ. यशवंत सुमंत स्मृती युवा संशोधन प्रेरणा पुरस्कार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील इतिहास विभागाचे संशोधक,प्राध्यापक डॉ. देवकुमार अहिरे (पुणे) यांना जाहीर झाला आहे.

पुरस्काराचे स्वरूप: डॉ. भा.ल. भोळे स्मृती पुरस्कारांसाठी प्रत्येकी वीस हजार रुपये, तर डॉ. यशवंत सुमंत स्मृती पुरस्कारांसाठी प्रत्येकी दहा हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह, शाल व मानपत्र असे आहे. (Nagorao Kumbhar)

हा उपक्रम माधुरी सुमंत, विजयाताई भोळे आणि दाते स्मृती संस्थेचे अध्यक्ष प्रदीप दाते यांच्या योगदानातून गेली अनेक वर्षांपासून महाराष्ट्रातील वैचारिक, साहित्यिक आणि सामाजिक क्षेत्रात राबविण्यात येत आहे. पुरस्कार निवड समितीमध्ये प्रदीप दाते, डॉ. राजेंद्र मुंढे, प्रा. हाशम शेख, डॉ. अशोक चौसाळकर, डॉ. चैत्रा रेडकर, विजयाताई भोळे, हिरण्यमय भोळे, माधुरी सुमंत आणि किशोर बेडकिहाळ या मान्यवरांनी काम पाहिले. (Nagorao Kumbhar)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00