Home » Blog » Jyoti Guru Maa :  बांग्लादेशी ‘ज्योती उर्फ गुरु माँ ‘ मुंबईत जमवली कोट्यवधींची माया

Jyoti Guru Maa :  बांग्लादेशी ‘ज्योती उर्फ गुरु माँ ‘ मुंबईत जमवली कोट्यवधींची माया

by प्रतिनिधी
0 comments
Jyoti Guru Maa

जमीर काझी :  मुंबई  :  मुंबई म्हणजे मायानगरी! जिथं दररोज हजारोंचे लोंढे आपली स्वप्नं घेऊन दाखल होतात. काहींची स्वप्नं खरी होतात, तर काही निराशेच्या गर्तेत हरवतात. पण या चकचकीत शहरात एका बांगलादेशी तृतीयपंथीयानं बनावट कागदपत्रांच्या जोरावर कोट्यवधींचं साम्राज्य उभारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ‘ज्योती’ उर्फ ‘गुरू माँ’ (खरं नाव बाबू अयान खान) ही गेल्या तीन  दशकापासून देशाच्या आर्थिक राजधानीत  अवैधपणे वास्तव्य करत होती. या कालावधीत तिने एक, दोन नाहीतर  तब्बल २० फ्लॅट्स, दुकानं आणि बरीच माया जमवल्याची माहिती दहशतवाद विरोधी पथकाच्या (एटीएस) तपासातून समोर आली आहे. सध्या ती अटकेत  असून तिच्याकडून आणखी महत्वपूर्ण माहिती उघडकीस येण्याची शक्यता वर्तविण्यात आली. (Jyoti Guru Maa)

मुर्शिदाबाद सीमेवरुन भारतात अवैध प्रवेश

 ज्योतीनं पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद सीमेवरून भारतात अवैध प्रवेश केला होता.  मुंबईत बस्तान बसवल्यानंतर तिनं तृतीयपंथी समुदायात ‘गुरू माँ’ म्हणून लौकिक मिळवला. ३०० हून अधिक अनुयायी तिच्या घरी धार्मिक विधी आणि आशीर्वादासाठी येत. बनावट आधार कार्ड, पॅन कार्ड आणि जन्म प्रमाणपत्राच्या आधारे तिनं मुंबईत आपलं साम्राज्य उभारलं. मार्च २०२५ मध्ये तिला पहिल्यांदा ताब्यात घेण्यात आलं होते.  पण बनावट कागदपत्रं दाखवून ती सुटली. ऑक्टोबर २०२५ मध्ये या कागदपत्रांची पडताळणी झाल्यावर ती घुसखोर असल्याचं उघड झाले. (Jyoti Guru Maa)

कोट्यवधींची माया आणि काळे कारनामे

ज्योतीकडे मुंबईतील रफीक नगर, गोवंडी यांसारख्या भागांत २० हून अधिक जंगम मालमत्ता असल्याचं उघड झाली आहेत. यात फ्लॅट्स, दुकाने आणि झोपडपट्टीतील जागांचा समावेश असून, त्यांची किंमत कोट्यवधी रुपये आहे. तिनं काही मोकळ्या जागा आणि झोपडपट्टीतील जागांवर अतिक्रमण करून २०० हून अधिक घरं ताब्यात घेतली. ही घरं भाड्याने देऊन दरमहा लाखोंची कमाई सुरू होती. इतकंच नव्हे, तर २०० हून अधिक बांगलादेशी नागरिकांना भारतात अवैधपणे आणण्यात तिचा सहभाग असल्याचंही तपासात समोर आलं आहे. हे स्थलांतरित कोलकात्यात चार ते पाच दिवस ठेवून बनावट कागदपत्रं तयार करून मुंबईत आणले जात होते. शिवाजी नगरातील खोल्यांमध्ये ठेवून पाच ते १० हजार रुपये भाडं आकारले जाई. यातील काहींना जबरदस्तीनं वेश्या व्यवसायासाठीदेखील पाठवलं जाई, अशी माहिती समोर आली आहे. ज्योतीविरोधात पासपोर्ट अधिनियम १९५०, परदेश आदेश १९४८, १९४६ आणि भारतीय न्याय संहिता अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात बनावट कागदपत्रं, फसवणूक, भारतात अवैध वास्तव्य आणि मानवी तस्करीसारख्या गंभीर आरोपांचा समावेश आहे. यापूर्वी शिवाजी नगर, नारपोली, देवनार, ट्रॉम्बे आणि कुर्ला पोलीस ठाण्यांत हाणामारीचे आणि सार्वजनिक उपद्रवासंबंधीचे पाच गुन्हे तिच्यावर दाखल असल्याची माहिती सांगण्यात आली. (Jyoti Guru Maa)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00