Home » Blog » 16 ministers resign in Gujarat : दिवाळीपूर्वीच गुजरातमध्ये ‘राजकीय बॉम्ब’ चा धमाका ; १६ मंत्र्यांचे राजीनामे

16 ministers resign in Gujarat : दिवाळीपूर्वीच गुजरातमध्ये ‘राजकीय बॉम्ब’ चा धमाका ; १६ मंत्र्यांचे राजीनामे

by प्रतिनिधी
0 comments
16 ministers resign in Gujarat

गांधीनगर : प्रतिनिधी : दिवाळीसाठी संपूर्ण देशभर उत्साहाचे वातावरण असताना गुजरातमध्ये १६ मंत्र्यांनी राजीनामे दिल्याने दिवाळीपूर्वीचे बॉम्ब फुटले आहेत. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल वगळता संपूर्ण गुजरात मंत्रीमंडळाने राजीनामा दिला आहे. मंत्रीमंडळात आठ कॅबिनेट आणि नऊ राज्यमंत्री असे १६ मंत्री आहेत. गुजरातच्या या राजकीय बॉम्बचे धक्के भाजप्रणित अन्य राज्यात बसणार का असा प्रश्न विचारला जात आहे. (16 ministers resign in Gujarat)

पीटीआयने १६ मंत्र्यांचे राजीनामे घेतले आहेत असे वृत्त दिले आहे. मुख्यमंत्री पटेल वगळता सर्व मंत्र्यांनी राजीनामे दिले आहेत, असे भाजपच्या सुत्रांनी सांगितले आहे. एकीकडे भाजपची बिहार विधानसभा निवडणूकीसाठी तिकीट वाटपाची धामधूम सुरू असताना गुजरातच्या सर्व मंत्र्यांच्या राजीनाम्याने खळबळ उडाली आहे. या निर्णयाचे महाराष्ट्रातील पडसाद उमटणार का याकडे राजकीय धुरिणांचे लक्ष लागले आहे. (16 ministers resign in Gujarat)

मुख्यमंत्री भुपेंद्र पटेल यांच्या सरकारचा जवळजवळ तीन वर्षाचा कालावधी पूर्ण होत आहे. गुजरातमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होणार आहेत. त्यापूर्वीच मंत्रीमंडळात आता फेरबदल होणार आहे. गुजरातच्या १८२ सदस्यांच्या विधानसभेत १६ मंत्री होते. त्यामध्ये नवीन मंत्रीमंडळात कुणाची वर्णी लागणार याकडे लक्ष लागले आहे. शुक्रवारी मंत्रीमंडळाचा विस्तार होणार आहे. नवीन मंत्र्यांना आचार्य देवव्रत एका समारंभात गोपनियतेची शपथ देणार आहेत. (16 ministers resign in Gujarat)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00