Home » Blog » Ashok Saraf : ‘स्विटी’ने मारली अशोकमामा म्हणून हाक

Ashok Saraf : ‘स्विटी’ने मारली अशोकमामा म्हणून हाक

by प्रतिनिधी
0 comments
Ashokmama

सतीश घाटगे : कोल्हापूर : कोल्हापूरमुळेच चित्रपटसृष्टीचा मी अशोकमामा झालो. कोल्हापूरने मला दिलेले हे नाव म्हणजे ही माझी ओळख आहे असे मत ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी व्यक्त केले. अशोक सराफ यांना अशोक मामा अशी हाक पहिल्यांदा कुणी मारली? ज्येष्ठ कॅमेरामन प्रकाश शिंदे यांची थोरली कन्या सुप्रिया उर्फ स्विटीने. सेटवर स्वीटीने मारलेली ‘अशोकमामा’ ही हाक अशोक सराफ यांच्या आयुष्यात कायम चिकटली. (Ashok Saraf)

कोल्हापुरने दिली अशोकमामा ओळख

ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना आज संगीतसूर्य केशवराव भोसले स्मृती पुरस्काराने गौरवण्यात आले. अखिल भारतीय नाट्य परिषदेतर्फे त्यांना पुरस्कार देण्यात आला. पुरस्कार प्रदानाच्या पूर्वसंध्येला अशोक सराफ यांनी दिलखुलास संवाद साधला. ते म्हणाले, चित्रपटाचे चित्रीकरण म्हणजे कोल्हापूर असे समीकरण असलेल्या काळात माझी कोल्हापूरची नाळ जुळली. कॅमेरामन प्रकाश शिंदे यांची मुलगी सेटवर यायची. तेव्हा ते माझी ओळख मामा म्हणून करुन द्यायचे. सेटवर सगळेच मला मामा म्हणायला लागले. आणि मी चित्रपटसृष्टीचा मामा झालो. कोल्हापूरने मला दिलेले नाव म्हणजे माझी ओळख आहे. (Ashok Saraf)

स्विटीने मारली पहिल्यांदा मामा म्हणून हाक

प्रकाश शिंदे कोल्हापुरात शिवाजी पेठेतील फिरंगाई तालमीजवळ राहत होते. त्यांना दोन कन्या व एक मुलगा आहे. त्यांची थोरली मुलगी सुप्रिया उर्फ स्विटी लहानपणी वडिलांबरोबर जयप्रभा आणि शांतकिरण स्टुडिओमध्ये चित्रपटाच्या सेटवर जायची. चित्रीकरणात ती सर्वांना हाका मारायची. प्रकाश शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अशोक सराफ यांची ओळख मामा म्हणून करुन दिली. ती अशोक सराफांना मामा म्हणून हाक मारायची. तिचा आवाज गोड असल्याने सर्वजण अशोक सराफांकडे बोट दाखवून हे कोण असे विचारायचे. तेव्हा ती मामा म्हणायची. नंतर ती अशोक मामा म्हणायला लागली. तिचे बोबडे बोल सर्वांना भावल्याने प्रत्येकजण स्टेजवर ‘अशोक मामा’ म्हणून हाक मारु लागली. तिची अशोक मामा म्हणून मारलेली हाक कायम राहिली. (Ashok Saraf)

अशोकमामांकडून होते आईची चौकशी

सुप्रिया उर्फ स्विटी प्रकाश शिंदे ही विवाहानंतर सुप्रिया शैलेश मोकाशी झाली आहे. ४२ वर्षीय सुप्रिया सध्या मुंबईत माझगांव येथे राहत आहे. पती शैलेश हे बेकरी व्यवसायासाठी साहित्य पुरवतात तर सुप्रिया गृहिणी आहे. सुप्रिया यांना एक मुलगी आहे. एबीपीवर माझा कट्टा आणि अन्य चॅनेलवर अशोक सराफ यांनी अशोक मामाची कथा सांगितल्यावर सुप्रिया यांनी अशोक सराफ यांची भेट घेतल्यावर ते खूप आनंदी झाले होते असे सुप्रिया यांनी सांगितले. त्यांनी माझी आई शोभा शिंदे यांची चौकशी करताना वहिणी कशी आहे? असे विचारले. त्यांनी वडिल प्रकाश शिंदे व आईच्या आठवणी सांगितल्या. दरवर्षी चार जूनला त्यांच्या वाढदिवशी शुभेच्छाशी फोन केल्यानंतर ते घरच्या सर्वांची चौकशी करतात. आता आमची ओळख घट्ट झाली आहे. त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाल्यानंतर मी त्यांची भेट घेऊन अभिनंदनही केले होते. (Ashok Saraf)

अशोकमामांबरोबर फोटो काढला

प्रकाश शिंदे यांच्या मुलीने अशोक मामा ही ओळख दिली पाहून मला खूप आनंद वाटतो असे सुप्रिया यांनी सांगितले. आमच्याकडे अशोक मामांचे खूप फोटो होते. रंजना यांनी मला काखेत घेऊन फोटो काढला होता. पण कोल्हापुरात २००५ ला जो मोठा पाऊस झाला त्यात अल्बम भिजल्याने फोटो भिजून खराब झाले. अशोक मामांची भेट घेऊन मी मुलीसोबत फोटो काढला आहे.  

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00