Home » Blog » Mithi river crosses danger level : मुंबईत मिठी नदीने धोक्याची पातळी ओलांडली

Mithi river crosses danger level : मुंबईत मिठी नदीने धोक्याची पातळी ओलांडली

by प्रतिनिधी
0 comments
Mithi river crosses danger level

मुंबई : प्रतिनिधी : रात्रभर सुरू असलेला पाऊस आणि मंगळवारी (१९ ऑगस्ट) सकाळपासून सुरू झालेला जोरदार पाऊस यामुळे मुंबईत सगळीकडे पाणीच पाणी झाले आहेत. त्यातच मुंबईतील मिठी नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून नागरी वस्तीत पाणी घुसण्याची भिती व्यक्त केली जात आहे. राज्य सरकारने मुंबईतील सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांना सुट्ट्या जाहीर केल्या आहेत. अनेक खासगी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना वर्क होमची सूट दिली आहे. तरीही मुंबईत जागोजागी पाणी भरु लागल्याने वाहतूक संथ झाली आहे.  मुंबई शहर आणि उपनगरात २०० ते ३५० मिली मीटर पावसाची नोंद झाली आहे. (Mithi river crosses danger level)

 सलग दुसऱ्या दिवशी सुरू असलेल्या अतिमुसळधार पावसामुळे अनेक सखल भागात गुडघाभर पाणी साचले आहे. मुंबईतील मिठी नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून हिंदमाता, किंग्ज सर्कल, गांधी मार्केट, परळ, लालबाग आणि अनेक सखल भाग पाण्याखाली गेला आहे. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मिठी नदी ओसंडून वाहू लागल्यामुळे वांद्रे, बीकेसी, माहीम परिसरात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. मिठी नदीची पाणी पातळी सध्या ४.७  मीटरवर पोहोचली आहे. असाच काही तास पाऊस सुरु राहिल्या, मिठी नदीचे पाणी पात्राबाहेर येऊन माहीम, कुर्ला, साकीनाका या भागांमध्ये पाणी शिरण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईकरांसाठी पुढील काही तास अतिशय महत्त्वाचे आहेत. दक्षिण मुंबईत पावसाचा जोर कमी झाला आहे, मात्र उपनगरामध्ये अजुनही जोरधार कोसळत आहे. त्यामुळे मिठी नदीच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. (Mithi river crosses danger level)

मुंबईतील पन्नालाल कंपाउंडमध्ये विजेचा धक्का बसून एकाचा मृत्यू झाला.

हवामान खात्याने मुंबईसाठी मंगळवारी दिवसभर रेड अलर्ट जारी केला आहे. प्रशासन हाय अलर्टवर आहे. मिठी नदी परिसरातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याची उपाय योजनाही सुरु आहे. इतर भागातील नागरिकांनाही सतर्क राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. मिठी नदीचे आपतकालिन दरवाजे (फ्लड गेट्स) बंद करण्यात आले आहे. त्याचा परिणाम सायन, चुनाभट्टी आणि दादर परिसरात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. दादरमध्ये गुडघाभर पाणी आहे. ओहोटी सुरु होईपर्यंत अतिमुसळधार पाऊस असाच सुरु राहिला तर मुंबईकरांना मोठ्या संकटाचा सामान करावा लागण्याची शक्यता आहे. मुंबईकरांसाठी पुढील काही तास अतिशय महत्त्वाचे आहेत. (Mithi river crosses danger level)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00