कोल्हापूर : प्रतिनिधी : पत्नीला पळवून नेणाऱ्याचा घरात घुसून खून केल्याची घटनेने कोल्हापूर शहरात खळबळ उडाली आहे. फुलेवाडी रिंग रोड परिसरातील गंगाई लॉनजवळ शुक्रवारी मध्यरात्री दीड वाजच्या सुमारास ही घटना घडली. तलवार, एडका, फायटर लोखंडी गजांनी कलेल्या सशस्त्र हल्ल्यात महेश राजेंद्र राख (वय २३, फुलेवाडी रिंगरोड, अहिल्याबाई होळकर नगर, कोल्हापूर )याचा खून करण्यात आला. करवीर पोलिस ठाण्यात या प्रकरणी सात जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. यावेळी खून करणाऱ्या हल्लेखोरांनी बियरच्या बाटल्या आणि दगड घरावर फेकून परिसरात दहशत माजवली. (Mahesh Rakh)
प्राथमिक माहितीनुसार, हा हल्ला पूर्व वैमनस्यातून करण्यात आला असून सिद्धांत गवळी, आदित्य गवळी, धीरज शर्मा, ऋषभ साळुंखे, मयूर कांबळे, पियूष पाटील, सद्दाम कुंडले अशी संशयितांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनार हल्लेखोर अदित्य गवळी याच्या पत्नीला महेश राख याने फूस लावून पळवून नेले होते. यावरुन दोघांमध्ये वाद सुरू होता. शुक्रवारी मध्यरात्री अदित्य गवळी आणि सिद्धांत गवळी हे दोघे भाऊन आपल्या मित्रांना घेऊन महेश राख याच्या घरी गेले. त्यांनी महेशच्या घरावर दगड आणि बियरच्या बाटल्या फेकत महेशच्या घरात घुसले. त्यानंतर त्यांच्यावर तलवार, एडक्याने वार केले. तसेच फायटर आणि लोखंडी गजाने मारहाण केली. त्यानंतर ते निघून गेले. महेशच्या घरच्यांनी त्याला सीपीआर हॉस्पिटलमध्ये उपचारास दाखल केले. पण उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. (Mahesh Rakh)
खुनाच्या घटनेची माहिती कळताच करवीर पोलिस उप अधीक्षक सुजित क्षीरसागर यांच्यासह करवीर पोलस ठाण्याचे घटनास्थळी पोहोचले. हल्लेखोरामध्ये काही सराईत गुन्हेगारांचा समावेश असल्याची माहिती पुढे आली आहे. पोलिस संशयितांचा शोध घेत आहे. (Mahesh Rakh)