नवी दिल्ली : विम्बल्डन टेनिस स्पर्धेतील अंतिम सामना ६-०, ६-० असा सपाटून पराभव खालेल्या अमांडा अनिसिमोवाने पराभव वचपा काढत इगा स्वाटेकरवचा पराभव करत अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम सामन्यात तिची लढत गतविजेती आर्यना साबालेन्का हिच्याबरोबर होणार आहे. (Amanda Anisimova)
गुरुवारी झालेल्या उपांत्य सामन्यात तिने जागतिक प्रथम मानांकित आणि चार वेळची विजेती नाओमी ओसाकला ६-७, ७-६, ६-३ असे हरवून युएस ओपनच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. गतविजेती आर्यना साबालेन्का हिच्याबरोबर तिची अंतिम लढत होणार आहे. २०२२ पासून हार्डकोटवर ग्रँड स्लॅम स्पर्धेत तिने कधीही फायनल चुकवलेली नाही. (Amanda Anisimova)
उपांत्य सामन्यात अमांडा अनिसोमोवाची लढत इगा स्वाटेकरबरोबर झाली. ५२ दिवसापूर्वी विम्बल्डनच्या अंतिम सामन्यात दोघी भिडल्या होत्या. त्यामध्ये इगाने अमांडाचा ६-०, ६-० असा फडशा पाडला. विम्बल्डनच्या ११४ वर्षात सर्वात एकतर्फी महिलाचा अंतिम सामना झाला होता. पण ५२ दिवसांनी अमांडाने इगा स्वाटेकरचा पराभव करत विम्ब्लडनच्या अंतिम सामन्याचा बदला घेतला. (Amanda Anisimova)