Home » Blog » Pawar on Maratha issue: पवार म्हणाले, मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल, पण…

Pawar on Maratha issue: पवार म्हणाले, मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल, पण…

by प्रतिनिधी
0 comments
Pawar on Maratha issue

अहिल्यानगर : मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी लाखोंच्या संख्येने मुंबईत उपस्थित असलेल्या मराठा बांधवांनी गेले दोन दिवस ठिय्या मारला आहे. पाऊस आणि वाऱ्याची तमा न बाळगता आंदोलक ठिकठिकाणी थांबून आहेत. मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू झाले आहे. (Pawar on Maratha issue)

मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावे, ही या आंदोलनाची प्रमुख मागणी आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकार जरांगे यांच्याशी चर्चा करून तोडगा काढण्याच्या प्रयत्नात आहे. न्या. शिंदे यांच्या समितीनेही जरांगे यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली.

दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर महत्त्वाचे विधान केले आहे. मराठा समाजाला आरक्षण दिले जाऊ शकते, असे त्यांनी म्हटले आहे. तमिळनाडूत आरक्षण वाढू शकते तर महाराष्ट्रात का नाही? असा सवाल त्यांनी केला. मराठा आरक्षणासाठी घटनेत दुरुस्ती करण्याची भूमिका घेतल्यास मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटू शकतो असे त्यांनी म्हटले आहे. (Pawar on Maratha issue)

अहिल्यानगर येथील एका कार्यक्रमात पवार बोलत होते.

आरक्षणाचा विषय केंद्राच्या अखत्यारितील असल्याचे विधान पवार यांनी यावेळी केले. ते म्हणाले, “आरक्षणाचे प्रश्न सोडवायचे असतील तर शेवटी राष्ट्रीय पातळीवर निर्णय घेतले गेले पाहिजेत. यामध्ये केंद्र सरकारने निर्णय घ्यावा लागेल. ७२ टक्के आरक्षण तामिळनाडूत होऊ शकतं, तर मग वेळप्रसंगी घटनेत दुरुस्ती करून आरक्षणाचा हा तिढा सोडवण्यासंबंधी निर्णय संसदेत घेतला पाहिजे.” (Pawar on Maratha issue)
आम्ही संसदेच्या काही सदस्यांबरोबर संवाद साधत आहोत. निलेश लंकेही या ठिकाणी आहेत, आमची आणि आणखी काही सहकाऱ्यांची एक बैठकही झाली, असे सांगून गरज पडली तर घटना दुरुस्ती करण्याची आवश्यकता आहे. ही बाब आपण देशाच्या आणि अन्य राज्याच्या घटकांना पटवून दिली तर कारण हा प्रश्न फक्त महाराष्ट्राचा नाही. प्रत्येक राज्यात लहान लहान घटक आहेत. शेतकरी वर्ग आहेत. त्यामुळे घटनेत दुरुस्ती करण्याची भूमिका घेतल्यास आरक्षणाचा प्रश्न सुटू शकतो, असे पवार यावेळी म्हणाले.

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00