Home » Blog » Asia Cup : अशिया कपसाठी संघ निवड, सूर्यकुमार कर्णधार, गिल उपकर्णधार, अय्यर, जयस्वाल आऊट

Asia Cup : अशिया कपसाठी संघ निवड, सूर्यकुमार कर्णधार, गिल उपकर्णधार, अय्यर, जयस्वाल आऊट

by प्रतिनिधी
0 comments
Asia Cup

नवी दिल्ली : प्रतिनिधी : अशिया कप क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघांची आज घोषणा करण्यात आली. सूर्यकुमार यादव कडे कर्णधारपदाची धुरा कायम राहणार असून इंग्लंड कसोटी मालिकेत यशस्वी कर्णधार म्हणून सुरेख कामगिरी करणाऱ्या शुभमन गिलकडे  उप कर्णधारपदाची जबाबदारी राहणार आहे. भारतीय संघात जसप्रित बुमराहला स्थान मिळाले असले तरी व्टेंटी २० क्रिकेटमध्ये धडाकेबाज कामगिरी करणाऱ्या श्रेयस अय्यर आणि यशस्वी जयस्वाल यांना संघात स्थान मिळाले नाही. (Asia Cup)

अशिया कप क्रिकेट स्पर्धेस युएईमध्ये ९ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. या स्पर्धेसाठी संघ निवड प्रमुख अजित आगरकर यांनी १५ खेळाडूंची निवड जाहीर केली. भारतीय संघाचे नेतृत्व सूर्यकुमार यादव करणार असून शुभमन गिल उपकर्णधार राहणार आहे. जसप्रित बुमराह संघात परतला आहे. आयपीएलमध्ये धावांचा रतीब घालणारा श्रेयस अय्यरला संघात स्थान मिळाले नाही. ऑफ स्पिनर वॉशिग्टंन सुंदर संघात स्थान मिळाले नाही. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत वेगवान गोलंदाजीत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या मोहम्मद सिराज यांना स्थान मिळाले आहे. आशिया कप क्रिकेट स्पर्धा ९ ते २८ सप्टेंबर दरम्यान दुबई आणि अबू धाबी येथे होणार आहे, ज्यामध्ये आठ संघ टी-२० स्वरूपात भाग घेतील. आशियाई क्रिकेट परिषदेने सर्व सामन्यांच्या ठिकाणांची पुष्टी केली आहे, ज्यामध्ये दुबईमध्ये ११ सामने आणि अबू धाबीमध्ये आठ सामने होणार आहेत, ज्यामध्ये अफगाणिस्तान आणि हाँगकाँग यांच्यातील स्पर्धेचा उद्घाटन सामना समाविष्ट आहे. या स्पर्धेत पाच पूर्ण एसीसी सदस्य – अफगाणिस्तान, बांगलादेश, भारत, पाकिस्तान आणि श्रीलंका – तसेच युएई, ओमान आणि हाँगकाँग दोन गटात विभागले जातील. ग्रुप अ मध्ये भारत, पाकिस्तान, यूएई आणि ओमान यांचा समावेश आहे, तर ग्रुप ब मध्ये श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि हाँगकाँग यांचा समावेश आहे. (Asia Cup)

भारतीय संघातील खेळाडूंची नावे अशी, सर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उप कर्णधार), अभिषेक शर्मा, टीलक वर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), जसप्रित बुमराह, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), हर्षित राणा, रिंकू शहा.  (Asia Cup)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00