Home » Blog » Trump slams India-Russia: भारत, रशिया ‘मृत अर्थव्यवस्था’: ट्रम्प

Trump slams India-Russia: भारत, रशिया ‘मृत अर्थव्यवस्था’: ट्रम्प

by प्रतिनिधी
0 comments
Trump slams India-Russia

वॉशिंग्टन : भारत आणि रशिया या ‘मृत अर्थव्यवस्था’ असल्याची टीका अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली. भारतावर २५ टक्के आयात कर आणि रशियाकडून इंधन आणि शस्त्रास्त्रे खरेदी केल्याबद्दल अनिर्दिष्ट ‘दंड’ आकारण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ट्रम्प यांनी या दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्था मृत असल्याचे विधान केले आहे. (Trump slams India-Russia)

ट्रुथ सोशल या सोशल प्लॅटफॉर्मवर भारत आणि रशियावर नव्याने हल्ला चढवत, ट्रम्प यांनी म्हटले आहे की ‘‘भारत रशियासोबत काय करतो याची मला पर्वा नाही. ते त्यांच्या मृत अर्थव्यवस्था खड्ड्यात घालू शकतात, मला फक्त आमच्या देशाची काळजी आहे.’’ (Trump slams India-Russia)

‘‘आम्ही भारतासोबत खूप कमी व्यवसाय केला आहे, त्यांचे दर खूप जास्त आहेत. ते जगातील सर्वाधिक आहेत,’’ असे ते पुढे म्हणाले.

त्यांच्या पोस्टने रशियाचे माजी राष्ट्राध्यक्ष दिमित्री मेदवेदेव यांना ‘‘त्यांच्या शब्दांवर लक्ष ठेवण्याचा इशारा’’ दिला होता. ते खूप धोकादायक क्षेत्रात प्रवेश करत आहेत!, असे श्री ट्रम्प यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे. (Trump slams India-Russia)
श्री मेदवेदेव यांनी २८ जुलै रोजी ‘एक्स’वर, ‘‘ट्रम्प रशियासोबत अल्टिमेटम खेळत आहेत: ५० दिवस किंवा १०… त्यांनी २ गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत : १. रशिया हा इस्रायल किंवा इराणही नाही. २. प्रत्येक नवीन अल्टिमेटम हा रशिया आणि युक्रेन नव्हे तर तर त्यांच्या स्वतःच्या देशासोबत एक धोका आहे. निसरड्या रस्त्यावर जाऊ नका!’’, असे म्हटले होते.

हेही वाचा :
अमेरिकेचे करधोरण भारतासाठी गंभीर बाब

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00