बेळगाव : प्रतिनिधी : बेळगाव शहर आणि परिसरात पावसाचा जोर तिसऱ्या दिवशीही कायम आहे. मुसळधार पावसामुळे सलग दुसऱ्या दिवशीही जिल्हाधिकाऱ्यांनी बेळगाव आणि खानापूर तालुक्यातील शाळा, कॉलेजना सुट्टी जाहीर केली आहे. खानापूर तालुक्यातील पंधरा गावांचा मुसळधार पावसामुळे संपर्क तुटला आहे. (Khanapur Rain)
मलप्रभा नदीचे पाणी पात्राबाहेर पडले असून मोठ्या प्रमाणावर पाणी आजूबाजूच्या शेतात पसरले आहे. हब्बनहट्टी येथील मारुती मंदिर पाण्याखाली गेले आहे. बेळगाव शहरात अनेक ठिकाणी झाडे पडून वाहतूक ठप्प झाली होती. (Khanapur Rain)
मणतुर्गानजीक असलेल्या हालात्री नदी पुलावर पाच फूट पाणी आल्यामुळे गोव्याला जाणारा खानापूर-हेमाडगा-अनमोड रस्ता बंद झाला आहे. सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे खानापूर-हेमाडगा मार्गावरील मणतुर्गा नजीक असलेल्या, हालात्री नदी पुलावर पाच फूट पाणी आले असल्याने या मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे. त्यामुळे वाहन चालक आणि प्रवासी पर्यायी मार्गाचा वापर करीत आहेत. पश्चिम घाटात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे खानापूर तालुक्यात ओढे, नाले तुडुंब भरून वाहत आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणचे रस्ते बंद झाले आहेत. खानापूर येथील रेल्वे स्थानकाजवळ असोगा रस्त्यावर रेल्वे मार्गाचे भुयारी काम सुरू आहे. त्या ठिकाणी पाणी साचून तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. (Khanapur Rain)
हेही वाचा :
देवरसांनी आणीबाणीचे समर्थन केले होते : सपकाळ
माळेगाव साखर कारखान्यात अजित पवार गटाची बाजी