Home » Blog » India’s Score : भारताच्या पहिल्या डावात ४७१ धावा

India’s Score : भारताच्या पहिल्या डावात ४७१ धावा

by प्रतिनिधी
0 comments
India’s Score

लीड्स : भारताने इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात दुसऱ्या दिवशी पहिल्या डावामध्ये ४७१ धावा केल्या. जैस्वाल आणि गिलपाठोपाठ रिषभ पंतनेही या डावात शतक झळकावले. मात्र, गिल-पंत जोडी फुटल्यानंतर भारताने झटपट विकेट गमावल्यामुळे उपहारानंतर अल्पावधीतच भारताचा डाव आटोपला. त्यानंतर, इंग्लंडने १२ षटकांत १ बाद ६५ धावांपर्यंत मजल मारली होती. (India’s Score)

हेडिंग्ले स्टेडियमवर सुरू असलेल्या या कसोटीत भारताने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या दिवसअखेर ३ बाद ३५९ धावा केल्या होत्या. शनिवारी गिल आणि पंत यांनी भारताचा डाव पुढे नेत संघाला ४०० धावांचा टप्पा ओलांडून दिला. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी २०९ धावांची भागीदारी रचली. यादरम्यान, पंतने कसोटी कारकिर्दीतील सातवे शतकही साजरे केले. अखेर बशीरला ही जोडी फोडण्यात यश आले. बशीरने शुभमनला बाद केले. अवघ्या तीन धावांनी दीडशतक हुकलेला शुभमन २२७ चेंडूंमध्ये १९ चौकार व एका षटकारासह १४७ धावा करून बाद झाला. (India’s Score)

तब्बल आठ वर्षांनी कसोटी संघात पुनरागमन करणारा करुण नायर खातेही न उघडता स्टोक्सच्या गोलंदाजीवर बाद झाला. ऑली पोपने एक्स्ट्रा कव्हरमध्ये त्याचा अप्रतिम झेल पकडला. जोश टंगने पंतला पायचीत पकडले. पंतने १७८ चेंडूंमध्ये १२ चौकार व ६ षटकारांसह १३४ धावा फटकावल्या. स्टोक्सने शार्दुल ठाकूरला बाद केल्यानंतर उपाहारासाठी खेळ थांबवण्यात आला. त्यावेळी भारताच्या ७ बाद ४५४ धावा झाल्या होत्या. रवींद्र जडेजा २ धावांवर खेळत होता. (India’s Score)

उपहारानंतर टंगने लागोपाठच्या षटकांमध्ये तीन विकेट घेऊन भारताचा डाव संपवला. भारताने ४१ धावांमध्ये अखेरच्या ७ विकेट गमावल्या. इंग्लंडकडून कर्णधार बेन स्टोक्स आणि जोश टंग यांनी प्रत्येकी ४ विकेट घेतल्या. भारताचा डाव आटोपल्यानंतर पावसाला सुरुवात झाल्यामुळे सुमारे तासभर खेळ होऊ शकला नाही. खेळ सुरू झाल्यानंतर बुमराहने पहिल्याच षटकात सलामीवीर झॅक क्राउलीला बाद करून इंग्लंडला पहिला धक्का दिला. त्यानंतर, बेन डकेट आणि ऑली पोप यांनी अर्धशतकी भागीदारी रचली. बाराव्या षटकाअखेर डकेट २९, तर पोप ३१ धावांवर खेळत होता

धावफलक : भारत (३ बाद २२१ वरून पुढे) शुभमन गिल झे. टंग गो. बशीर १४७, रिषभ पंत पायचीत गो. टंग १३४, करुण नायर झे. पोप. गो. स्टोक्स ०, रवींद्र जडेजा त्रि. गो. टंग ११, शार्दुल ठाकूर झे. स्मिथ गो. स्टोक्स १, जसप्रीत बुमराह झे. ब्रुक गो. टंग ०, महंमद सिराज नाबाद ३, प्रसिध कृष्णा त्रि. गो. टंग १, अवांतर ३१, एकूण ११३ षटकांत सर्वबाद ४७१.

बाद क्रम ४-४३०, ५-४४७, ६-४५३, ७-४५४, ८-४५८, ९-४६९, १०-४७१.

गोलंदाजी ख्रिस वोक्स २४-४-१०३-०, ब्रायडन कार्स २२-५-९६-१, जोश टंग २०-०-८६-४, बेन स्टोक्स २०-२-६६-४, शोएब बशीर २७-६-१००-१.

इंग्लंड पहिला डाव – झॅक क्राउली झे. नायर गो. बुमराह ४, बेन डकेट खेळत आहे २९, ऑली पोप खेळत आहे ३१, अवांतर १, एकूण १२ षटकांत १ बाद ६५.

बाद क्रम १-४.

गोलंदाजी जसप्रीत बुमराह ५-२-२१-१, महंमद सिराज ४-०-२५-०, प्रसिध कृष्णा ३-०-१८-०.





हेही वाचा :
भारत इंग्लंड ट्रॉफीचे ‘बारसे’

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00