Home » Blog » Operation Honeymoon: ऑपरेशन हनिमून; नेमके काय आणि कसे घडले?

Operation Honeymoon: ऑपरेशन हनिमून; नेमके काय आणि कसे घडले?

by प्रतिनिधी
0 comments
Operation Honeymoon

हनिमूनसाठी गेलेल्या जोडप्यांपैकी राजा रघुवंशी याची हत्या म्हणजे एक सुनियोजित षड्यंत्र आणि सुपारी देऊन केलेले हत्याकांड असल्याचे पोलिस तपासातून उघड झाले आहे. मेघालय पोलिसांनी या प्रकरणाला ‘ऑपरेशन हनीमून’ असे नाव दिले असून या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन त्याचे धागेदोरे उलगडले आहेत. (Operation Honeymoon)

  • डॉ. विजय चोरमारे

इंदूरहून शिलाँगला हनिमूनसाठी गेलेल्या जोडप्यांपैकी राजा रघुवंशी याची हत्या आणि त्याची पत्नी सोनम बेपत्ता झाल्याच्या बातमीने देशभर खळबळ उडाली होती. २१ मे रोजी घडलेल्या या घटनेमुळे केवळ ईशान्य भारतच नव्हे, तर संपूर्ण देश हादरून गेला होता. देशभरातील प्रसारमाध्यमांतून त्याची चर्चा सुरू झाली होती.

देशभर खळबळ उडाली असताना सोनम रघुवंशी नऊ जून रोजी अचानक उत्तर प्रदेशातील गाझीपूरमध्ये ‘प्रकट’ झाली. त्यावरून एकूण या प्रकरणाबाबतचा गोंधळ वाढवला. राजाची हत्या सोनमने घडवून आणल्याचा दावा मेघालय पोलिस करीत असताना, आपले अपहरण केल्याचा दावा सोनमने केला होता. त्यामुळे एकूण या प्रकरणाची गुंतागुंत वाढली होती. सोनम आणि राजा रघुवंशीच्या नातलगांनी केलेल्या वक्तव्यांनी गोंधळात भर टाकली होती. परंतु मेघालय पोलिसांनी या प्रकरणाचे धागेदोरे उलगडले आहेत. (Operation Honeymoon)

पोलिसांनी ऑपरेशन हनिमून असे नाव दिलेले हे नेमके प्रकरण काय आहे आणि त्याचे धागेदोरे कसे उलगडत गेले, हे समजून घेणे महत्त्वाचे आहे.

सोनम आणि राजा रघुवंशी या दोघांच्याही कुटुंबांनी दिलेल्या म्हटले आहे की, राजा आणि सोनमच्या लग्नापूर्वी त्यांची भेट आणि बोलणे झाले होते. दोघेही लग्नासाठी तयार होते, आनंदी होते. (Operation Honeymoon)

त्याचमुळे सोनमच राजाच्या हत्येत सामील कशी असेल, असा प्रश्न सुरुवातीला उपस्थित केला जात होता. सोनम राजाशी लग्नासाठी तयार होती आणि आनंदी होती, तर फक्त १५ दिवसांत तिने राजाची हत्या का घडवून आणली? इंदौरहून शिलाँगला जाऊन हत्या घडवणे, संपूर्ण योजना बनवणे, हे सर्व इतक्या लवकर आणि इतक्या सहजतेने शक्य होते का? असे प्रश्न उपस्थित केले जात होते. पोलिसांनी त्याही सगळ्या प्रश्नांची उत्तरे शोधली आहेत.

सोनमचे वडील देवीसिंह कुशवाह यांची इंदूरमध्ये प्लायवूड फॅक्टरी आहे. तिथे काम करणाऱ्या राज कुशवाह या तरुणाशी सोनमचे प्रेमसंबंध होते. त्याच्यासोबत राहण्यासाठीच सोनमने पती राजा कुशवाहची हत्या केल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. या हत्याकांडाचे सगळे नियोजन एकट्या सोनमनेच केले असून अनेक धक्कादायक बाबी पोलिस तपासातून समोर आल्या आहेत.

आपल्या वडिलांना हृदयविकाराचा त्रास आहे. त्यांना प्रेमविवाह मान्य होणार नाही. त्यामुळे मी त्यांच्या इच्छेनुसार राजा रघुवंशीशी लग्न करते. दरम्यान पतीला संपवते. त्यानंतर मी तुझ्याशी लग्न करते, असे सोनमने राज कुशवाहला सांगितले होते. त्याचसाठी पुढची सगळी पटकथा रचली आणि त्यानुसार राजा रघुवंशीची हत्या करण्यात आली.

हनिमूनला जाण्यासाठी पती राजा रघुवंशीचे आणि आपले विमानाचे तिकिट सोनमनेच बुक केले होते. त्याचवेळी तिने चार संशयितांची रेल्वेची तिकिटे बुक केली होती. आपला प्रियकर राज कुशवाह याच्यासह आकाश राजपूत, आनंद कुर्मी आणि विशाल चौहान असे हे चौघेजण होते. प्रत्यक्षात चौघे रेल्वे स्टेशनवर आले तेव्हा राज कुशवाहने येण्यास नकार दिला आणि तो ट्रेनमध्ये बसला नाही. उरलेले तिघेजण नियोजनानुसार ट्रेनने पोहोचले. त्यांच्या निवासाची व्यवस्था सोनमनेच केली होती.

ही घटना म्हणजे एक सुनियोजित षड्यंत्र आणि सुपारी देऊन केलेले हत्याकांड असल्याचे पोलिस तपासातून उघड झाले आहे. मेघालय पोलिसांनी या प्रकरणाला ‘ऑपरेशन हनीमून’ असे नाव दिले असून या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन त्याचे धागेदोरे उलगडले आहेत. लग्नानंतर अवघ्या दहा दिवसांनी या हत्येची पटकथा लिहिली गेली असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. हत्या झालेल्या राजा रघुवंशीची पत्नी सोनम रघुवंशी हीच या हत्येची मूळ सूत्रधार आहे, असल्याचा पोलिसांचा दावा आहे. हत्येतील तिच्या सहभागाचे अनेक भक्कम पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत. (Operation Honeymoon)

गाझीपूरच्या धाब्यावर प्रगटल्यानंतर सोनमने सांगितले की, तिला बंदिवासात ठेवले गेले होते. “लुटमार करून माझे अपहरण करण्यात आले. एका खोलीत मला बंद ठेवले गेले. गाडीत बसवून गाझीपूरच्या ढाब्यावर सोडले.”

परंतु तिची ही कहाणी काल्पनिक आणि दिशाभूल करणारी असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

मेघालय पोलिसांनी या प्रकरणाला ‘ऑपरेशन हनिमून’ असे नाव दिले, कारण ही हत्या हनिमून ट्रिपदरम्यान घडली. या ट्रिपचे नियोजन स्वतः सोनमने केले होते. संपूर्ण देशाला हादरवून टाकणाऱ्या या प्रकरणाची देशभरातील माध्यमांतून चर्चा झाली. मेघालयातील पर्यटनावरही त्याचा विपरित परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली. त्यामुळे स्थानिक पोलिसानी अत्यंत गांभीर्याने तपास केला. पोलिसांच्या मुख्य पथकात २० तज्ज्ञ अधिकारी आणि एकूण १२० पोलीस कर्मचारी सामील होते. सात जून रोजी सर्व संशयित ठिकाणांवर एकाच वेळी छापे टाकण्यात आले. त्यातून पोलिसांच्या हाती महत्त्वाचे पुरावे मिळाले.

हत्याकांडातील तीन संशयितांशी सोनमची आधीपासूनच ओळख होती. घटनेपूर्वी दहा किलोमीटर अंतरावर त्या तिघांसोबत ती दिसली होती. राजा रघुवंशी आणि सोनम ज्या हॉटेलात थांबले होते, तिथून जवळच्या हॉटेलमध्ये संशयित थांबले होते. पोलिसांच्या हाती सुमारे ४२ सीसीटीव्ही फुटेज लागले आहेत. स्कुटीच्या मागावरूनही बरीच माहिती मिळाली. आरोपींच्या म्हणण्यानुसार, सोनमने त्यांना राजा रघुवंशीला ठार करण्यास सांगितले.

सोनमने दरम्यानच्या काळात केलेल्या प्रवासावरून तिच्या हत्येतील सहभागाबाबत

  • २१ मे : सर्व आरोपी गुवाहाटीला पोहोचले.
  • २२ मे : आरोपी शिलाँगला पोहोचले.
  • २३ मे : राजा रघुवंशीची हत्या
  • सोनम २३ मे रोजी गुवाहाटीहून इंदूरला निघाली.
  • २५ मे रोजी ती इंदूरला पोहोचली आणि तिथे ती राजाला भेटली. राजाने तिला एक दिवस इंदूरमध्ये भाड्याच्या खोलीत थांबवले. (Operation Honeymoon)
  • पोलिसांना ३ आणि ४ जूनलाच अंदाज आला होता की, सोनम या हत्येत सामील आहे. आकाशचा रक्ताने माखलेला शर्ट घटनास्थळी सापडला. सोनमने आकाशला दिलेला रेनकोट घटनास्थळापासून ६ किलोमीटर अंतरावर सापडला. हे तपास भटकवण्यासाठी केले गेले होते.
  • आनंद कुर्मीला जेव्हा पकडले गेले, तेव्हा घटनेच्या वेळी त्याने घातले होते, तेच कपडे त्याच्या अंगावर होते. हत्येनंतर सर्व आरोपी ११ किलोमीटर अंतरावर एकत्र जमले.
  • घटनास्थळावरून आकाशचा रक्ताने माखलेली शर्ट जप्त करण्यात आला.
  • सोनमने दिलेला रेनकोट ६ किमी दूर सापडला.
  • आनंद कुर्मी तेच कपडे घालून पकडला गेला, जे हत्येच्या वेळी त्याने परिधान केले होते.
  • हत्येनंतर सर्व आरोपी ११ किमी दूर एका ठिकाणी जमले.

यावरून पोलिसांना हत्येचे धागेदोरे उलगडण्यात यश आले.

हत्येत वापरलेले हत्यार गुवाहाटीतील एका हॉटेलबाहेरील दुकानातून खरेदी केले गेले.

सोनम आणि राजा रघुवंशीच्या हनीमून ट्रिपदरम्यान एकही फोटो काढला गेला नाही. सोशल मीडियावरसुद्धा कोणतीही माहिती दिली गेली. यामुळेच पोलिसांना संशय निर्माण झाला. मात्र हत्येनंतर अवघ्या १५ मिनिटांनंतर राजा रघुवंशीच्या अकाउंटवरून एक पोस्ट करण्यात आली: “सात जन्मांची साथ आहे.” ही पोस्ट सोनमने स्वतः केली होती, ज्यामुळे ती संशयाच्या भोवऱ्यात सापडली.

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00