अहमदाबाद : लंडनला जाणारे एअर इंडियाचे बोईंग विमान गुरुवारी (११ जून) दुपारी पावणे दोनच्या सुमारास कोसळले. अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर ते जवळच्याच मेघनी नगर या निवासी भागात कोसळले. हे विमान एका इमारतीवर कोसळले. ते कोसळताना स्फोटासारखे एका पाठोपाठ एक प्रचंड आवाज झाले. त्यामुळे परिसरात घबराट पसरली. २४२ प्रवासी आणि कर्मचाऱ्यांसह उड्डाण केलेले हे विमान अपघातग्रस्त झाल्याने अनेक जण जखमी झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या दुर्घटनेची भीषणता दाखवणारी छायाचित्रे. (Plane crash in Ahmadabad)
अहमदाबाद : विमान दुर्घटनेतील जखमींना तत्काळ उपचारासाठी हलविताना कर्मचारी.
अहमदाबाद : आगीत विमान बेचिराख झाले होते. घटनास्थळी विमानाचे जळालेले अवशेष उरले होते. (Plane crash in Ahmadabad)
अहमदाबाद : अग्निशमन दलाचे जवान विमानाची आग विझविताना. (Plane crash in Ahmadabad)अहमदाबाद : विमान ज्या इमारतीवर कोसळले तेथेही आग लागली. ती विझविताना अग्निशमन दलाचे जवान.