Home » Blog » Jairam slams Shah: शहांचा शांततेचा दावा हास्यास्पद : काँग्रेस

Jairam slams Shah: शहांचा शांततेचा दावा हास्यास्पद : काँग्रेस

by प्रतिनिधी
0 comments
Jairam slams Shah

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीर आणि ईशान्येकडील भागात शांतता प्रस्थापित झाल्याचा गृहमंत्री अमित शहा यांचा दावा विचित्र आणि हास्यास्पद असल्याची टीका काँग्रेसने मंगळवारी (१० जून) केली. शहा यांना मोठे अपयश आले आहे. या अपयशावरून लोकांचे लक्ष विचलीत करण्यासाठी त्यांनी हे विधान केले असल्याचा आरोपही काँग्रेसने केला. (Jairam slams Shah)

पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा शिकविण्यात किंवा मणिपूरमधील स्थिती पुनर्स्थापित करण्यात ते अपयशी ठरले आहे. त्यानंतरही केंद्र सरकार त्यांच्या ‘‘कथित’’ कामगिरीचा जयघोष करत आहे असा दावा काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी केला.

‘‘जम्मू-काश्मीर आणि मणिपूरमधील शांततेबद्दल केंद्रीय गृहमंत्र्यांनी काल केलेले दावे हास्यास्पद आणि निराधार आहेत. प्रत्यक्षात त्यांच्या स्वतःच्या मोठ्या अपयशांवरून लक्ष विचलित करण्यासाठी हे दावे केले गेले आहेत. २२ एप्रिल २०२५ रोजी पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यांतील दहशतवाद्यांना अद्याप पकडलेले नाही. काही अहवालांनुसार,डिसेंबर २०२३ मध्ये पूंछ आणि ऑक्टोबर २०२४ मध्ये गगनगीर आणि गुलमर्ग येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमध्येही हेच दहशतवादी सहभागी होते, ज्याचे खंडन झालेले नाही,’’ असे जयराम म्हणाले. (Jairam slams Shah)

मणिपूरमधील कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती अत्यंत खराब स्थितीत आहे. मणिपूर अजूनही जळत आहे. राज्यातील राष्ट्रपती राजवटही पूर्ण अपयशी ठरल्याचे त्यांनी म्हटले आहे.

राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. सामान्य लोकांच्या दैनंदिन जीवन आणि उपजीविका करताना प्रचंड हाल होत आहेत, त्यांच्या या दुर्दशेमुळे त्यांच्यात दुःख, निराशा आणि संतापाची भावना आहे. केंद्रीय गृहमंत्री पहलगामच्या दहशतवाद्यांना शिक्षा करू शकले नाहीत किंवा मणिपूरमध्ये सामान्य स्थिती पूर्वपदावर आणू शकलेले नाहीत, तरीही ते या दोन्ही राज्यांमध्ये त्यांच्या कथित कामगिरीचे कौतुक करतात,’’ अशी टीका त्यांनी केली. (Jairam slams Shah)

स्वतंत्र भारताच्या इतिहासात, असा क्वचितच केंद्रीय गृहमंत्री झाला असेल ज्यांचा संपूर्ण कार्यकाळ किमान कामगिरीचा मात्र जास्तीत जास्त बढाई मारण्याचा आहे. त्यांनी आपल्या मुलासाठी जे काही केले आहे ते यश मानले गेले तर ते वेगळे यश म्हणता येईल, असा टोलाही रमेश यांनी लगावला.

हेही वाचा :
आगामी निवडणुकीत वेगळे चित्र दिसेल : पवार
लोकसभा उपाध्यक्ष निवडीसाठी मोदींकडे काँग्रेसचा आग्रह

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00