Home » Blog » England wins : इंग्लंडची मालिकेत विजयी आघाडी

England wins : इंग्लंडची मालिकेत विजयी आघाडी

by प्रतिनिधी
0 comments
England wins

ब्रिस्टॉल : वन-डे मालिकेतील निर्भेळ यशापाठोपाठ इंग्लंडने वेस्ट इंडिजविरुद्धची टी-२० क्रिकेट मालिकेतही सलग दुसऱ्या विजयासह २-० अशी विजयी आघाडी घेतली. वेस्ट इंडिजचे ६ बाद १९६ धावांचे आव्हान इंग्लंडने १८.३ षटकांत ६ विकेटच्या मोबदल्यात पार केले. (England wins)

या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. डावाच्या पहिल्याच चेंडूवर विंडीजचा सलामीवीर एविन ल्युइस बाद झाल्यानंतर जॉन्सन चार्ल्स आणि कर्णधार शाय होप्स यांनी दुसऱ्या विकेटसाठी ९० धावांची भागीदारी रचली. चार्ल्सने ३९ चेंडूंमध्ये प्रत्येकी ३ चौकार व षटकारांसह ४७, तर होपने ३८ चेंडूंमध्ये २ चौकार, ४ षटकारांसह ४९ धावा केल्या. हे दोघे बाद झाल्यानंतर मधल्या षटकांत रॉव्हमन पॉवेल आणि अखेरच्या षटकांत जेसन होल्डरच्या फटकेबाजीमुळे विंडीजला दोनशेच्या आसपास पोहोचता आले. पॉवेलने १५ चेंडूंमध्ये ३४, तर होल्डरने अवघ्या ९ चेंडूंमध्ये नाबाद २९ धावा फटकावल्या. इंग्लंडतर्फे ल्यूक वूडने २ विकेट घेतल्या. (England wins)

विंडीजच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवातही वाईट झाली. सलामीवीर जेमी स्मिथ दुसऱ्याच षटकात बाद झाला. त्यानंतर, बेन डकेट (३४) आणि जोस बटलर (४७) यांनी दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी रचली. कर्णधार हॅरी ब्रुक (३४) आणि जेकब बेथेल (२६) यांनीही विजयासाठी हातभार लावला. टॉम बँटन आणि ब्रायडन कार्स यांनी अठराव्या षटकात इंग्लंडचा विजय साकारला. बँटनने ११ चेंडूंमध्ये ३ चौकार व २ षटकारांसह नाबाद ३० धावा केल्या. या मालिकेतील अखेरचा सामना १० जून रोजी साउदम्प्टन येथे होणार आहे. (England wins)

संक्षिप्त धावफलक : वेस्ट इंडिज – २० षटकांत ६ बाद १९६ (जॉन्सन चार्ल्स ४७, शाय होप ४९, रॉव्हमन पॉवेल ३४, ल्यूक वूड २-२५, जेकब बेथेल १-२४) पराभूत विरुद्ध इंग्लंड – १८.३ षटकांत ६ बाद १९९ (जोस बटलर ४७, हॅरी ब्रुक ३४, टॉम बँटन नाबाद ३०, अल्झारी जोसेफ २-४५, रॉस्टन चेस १-१५).

हेही वाचा :
ख्रिस्तियानो रोनाल्डोला अश्रू अनावर….

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00