Home » Blog » NEET-PG Postponed : नीट-पीजी परीक्षा लांबणीवर

NEET-PG Postponed : नीट-पीजी परीक्षा लांबणीवर

by प्रतिनिधी
0 comments
NEET-PG Postponed

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नीट पीजी २०२५ परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. ही परीक्षा एकाच शिफ्टमध्ये घेण्यात येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने दोन शिफ्टमध्ये परीक्षा न घेण्याचे आदेश दिल्यानंतर ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय राष्ट्रीय शिक्षण मंडळाने घेतला आहे. (NEET-PG Postponed)

एनबीईच्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नीट पीजी २०२५ परीक्षा एकाच शिफ्टमध्ये घेण्यासाठी आवश्यकता ती व्यवस्था निर्माण केली जाणार आहे. परीक्षेत संपूर्ण पारदर्शकात राखली जाणार असून सुरक्षित केंद्रे कार्यान्वित केली जाणार आहेत. ही परीक्षा आधी १५ जून रोजी होणार होती; परंतु, न्यायालयाच्या निर्देशांमुळे ती नंतरच्या तारखेला पुढे ढकलण्यात आली आहे. नवीन परीक्षेची तारीख लवकरच कळवली जाईल असे एनबीईने म्हटले आहे. (NEET-PG Postponed)

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती विक्रम नाथ, न्यायमूर्ती संजय कुमार आणि न्यायमूर्ती एनव्ही अंजारिया यांच्या खंडपीठाने पारदर्शकता सुनिश्चित करून एनबीईला नीट-पीजी २०२५ एकाच शिफ्टमध्ये घेण्याची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले आहेत. १५ जून रोजी होणाऱ्या परीक्षेसाठी आवश्यक व्यवस्था करण्यासाठी अजूनही वेळ शिल्लक असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले होते.

“दोन शिफ्टमध्ये परीक्षा घेतल्याने मनमानी निर्माण होते आणि त्यामुळे सर्व उमेदवार एकाच पातळीवर राहत नाहीत. कोणत्याही दोन प्रश्नपत्रिका कधीही एकाच पातळीच्या अडचणीच्या किंवा सोप्या असल्याचे म्हणता येणार नाही. त्यात फरक असला पाहिजे “, असे न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे. (NEET-PG Postponed)

एकाच शिफ्टमध्ये परीक्षा घेण्यासाठी पुरेशी केंद्रे नव्हती या एनबीईच्या युक्तिवादाला नकार देत न्यायालयाने असे निरीक्षण नोंदवले. “ही परीक्षा फक्त एका शहरात नाही तर संपूर्ण देशभर घेतली जाणार आहे. आम्ही संपूर्ण देशात हे मान्य करण्यास तयार नाही आणि या देशातील तांत्रिक प्रगती लक्षात घेता, परीक्षा मंडळाला परीक्षा घेण्यासाठी आणि एका शिफ्टमध्ये पुरेशी केंद्रे सापडली नाहीत.”. राष्ट्रीय परीक्षा मंडळाच्या नीट पीजी २०२५ दोन शिफ्टमध्ये घेण्याच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकांच्या एका गटावर सुनावणी करताना खंडपीठाने हा आदेश दिला. (NEET-PG Postponed)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00