Home » Blog » Martyr : पाकिस्तानशी लढताना चार जवान शहीद

Martyr : पाकिस्तानशी लढताना चार जवान शहीद

दोन लष्करातील, प्रत्येकी एक वायुसेना, बीएसएफमधील जवान

by प्रतिनिधी
0 comments
Martyr

नवी दिल्ली : पाकिस्तानशी लढताना भारताचे चार जवान शहीद झाले. जम्मू पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबारात दोन लष्करी जवान, एक भारतीय वायसेना सार्जंट आणि एक बीएसएफ निरीक्षकाला वीरमरण प्राप्त झाले. (Martyr)

जम्मू मध्ये पाकिस्तान सैन्याकडून झालेल्या गोळीबार आणि ड्रोन हल्ल्यात गेल्या चोवीस तासात दोन जवान गमावले. आयएएफचा एक आणि एक उप निरीक्षक शहीद झाला. त्यांच्या युनिटमधील सात जण जखमी झाले. (Martyr)

हिमाचल प्रदेशातील जेसीओ सुभेदार मेजर पवन कुमार यांचा शनिवारी सकाळ पुंछमधील कृष्णा घाटी सेक्टरमध्ये त्याच्या चौकीजवळ तोफखान्याचा स्फोट होऊन लढत असताना वीरमरण प्राप्त झाले. आरएस पुरा सेक्टरमध्ये रात्रीचा गोळीबार आणि तोफगोळ्यांदरम्यान गंभीर जखमी झालेले जम्मू काश्मीर लाईट इन्फ्रंटीचे २५ वर्षीय रायफलमन सुनील कुमार यांचे निधन झाले. भारतीय हवाई दलाच्या ३६ व्या विंगमध्ये कार्यरत असलेले ३६ वर्षीय वैद्यकीय सहाय्यक सार्जंट सुरेंद्र कुमार मोगा हे जम्मू काश्मीरच्या उधमपूर तैनात असताना पाकिस्तानी हल्ल्यात शहीद झाले. सुरेंद्र कुमार मोगा हे बेंगळूरमधील असून भारत पाकिस्तानच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ते उधमपूरला भारतीय लष्काराच्या सेवेत आले होते. राजस्थानमधील झुंझनू येथील मेहरादासी गावातील मोगा कुटुंबाला शनिवारी माहिती देण्यात आली आहे. त्याच्या पश्चात ६५ वर्षीय आई नानू देवी, पत्नी सीमा आणि दोन मुले आहेत.  (Martyr)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00