Home » Blog » Youtube channels : पाकिस्तानी यूट्यूब चॅनेल्सवर बंदी

Youtube channels : पाकिस्तानी यूट्यूब चॅनेल्सवर बंदी

गृहखात्यांकडून चॅनेल्सची यादी प्रसिद्ध

by प्रतिनिधी
0 comments
Youtube channels

नवी दिल्ली :  जम्मू काश्मिरमधील पहेलगाम हल्याच्या पार्श्वभूमीवर चुकीची आणि प्रक्षोभक माहिती पसवणाऱ्या पाकिस्तानातील यूट्यूब चॅनेल्सवर भारत सरकारने बडगा उगारला आहे. पाकिस्तानी १६ यूट्यूब चॅनेल्सवर बंदी आणली आहे. (Youtube channels)

पहेलगाममध्ये झालेल्या अतिरेक्यांच्या दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांना जीव गमवावा लागला. या भ्याड हल्ल्यानंतर  भारत सरकारने पाकिस्तानवर निर्बंध आणण्यास सुरूवात केली असून सोमवारी पाकिस्तानमधील १५ यू ट्यूब चॅनेल्सवर बंद आणली आहे. ही चॅनेल्स अतिशय चुकीची आणि दशाभूल करणारी माहिती वेगाने पसरवत होती.  त्यामध्ये डॉन न्यूज, समा टीव्ही, आर्य न्यूज, जिओ न्यूज, ईर्शाद भट्टी, बोल न्यूज, रफ्तार, द पाकिस्तनी रेफरन्स, समा स्पोर्टस्, जीएनएन, युझिर क्रिकेट, उमर सीमा एक्सक्लिझिव्ह, आस्मा शिराझी, मुनिब फारुक, सुनो न्यूज एचडी, राझी नमा या चॅनेल्सचा समावेश आहे. (Youtube channels)

या ट्यूब चॅनेल्सकडून धार्मिक आणि सांप्रदायिक घटनांवर चुकीची माहिती पसरवत असल्याच्या कारणांवरुन ही बंदी घातली आहे. या चॅनेल्सकडून दिशाभूल करणारी वक्तव्ये दिली जात होती. (Youtube channels)

भारताने यापूर्वी पाकिस्तानवर अनेक निर्बंध लादले आहेत. त्यामध्ये सिंधू पाणी वाटप करार रद्द करण्यात आला आहे. तसेच कायदेशीर व्हिसाद्वारे भारतात वास्तव्य करणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द केले असून त्यांना परत पाकिस्तानात पाठवले गेले आहे. (Youtube channels)

हेही वाचा :

भारतात पाच लाखाहून अधिक पाकिस्तानी महिला

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00