Home » Blog » Mixed gold : सुरुची सिंहला दुसरे सुवर्ण

Mixed gold : सुरुची सिंहला दुसरे सुवर्ण

१० मी. पिस्टलच्या मिश्र सांघिक गटात सौरभ चौधरीसह यशस्वी कामगिरी

by प्रतिनिधी
0 comments
Mixed gold

लिमा : भारताची नेमबाज सुरुची सिंहने आयएसएसएफ वर्ल्ड कप नेमबाजी स्पर्धेमध्ये सलग दुसऱ्या दिवशी सुवर्णपदकावर नाव कोरले. १० मीटर एअर पिस्टल प्रकाराच्या मिश्र सांघिक गटामध्ये तिने सौरभ चौधरीच्या साथीने सुवर्णपदकविजेती कामगिरी केली. या गटात भारताच्या मनू भाकेर-रविंदर सिंग यांचे ब्राँझ थोडक्यात हुकले. (Mixed gold)

सुरुचीने या स्पर्धेमध्ये बुधवारी १० मी. एअर पिस्टल प्रकाराचे महिला गटातील सुवर्णपदक जिंकले होते. गुरुवारी मिश्र गटात सुरुची-सौरभ जोडी प्राथमिक फेरीमध्ये ५८० गुणांची कमाई करत दुसऱ्या स्थानावर राहिले. त्यामुळे, त्यांचा अंतिम फेरीतील प्रवेश निश्चित झाला. अंतिम फेरीत त्यांचा सामना क्विआन्शुन याओ-काई हू या जोडीशी झाला. मनू-रविंदर जोडी प्राथमिक फेरीत ५७९ गुण मिळवून चौथ्या स्थानावर राहिली. त्यांचा सामना क्विआन्के मा-यिफान झँग यांच्याशी झाला. अंतिम फेरीत सुरुची-सौरभ जोडीने क्विआन्शुन-काई जोडीवर १७-९ अशी मात केली. या फेरीच्या पहिल्या शॉटपासून भारतीय जोडीने घेतलेली आघाडी अखेरपर्यंत कायम ठेवली. ब्राँझपदकाच्या लढतीत मा-झँग जोडीने मनू-रविंदर यांच्यावर १६-६ असा विजय मिळवला. याबरोबरच, भारताने या स्पर्धेत मिळवलेल्या पदकांची संख्या चारवर पोहोचली आहे. (Mixed gold)
या स्पर्धेच्या स्कीट प्रकारामध्ये महिला गटात भारताच्या रायझा धिल्लाँने अंतिम फेरीत प्रवेश केला होता. अंतिम फेरीत मात्र तिला २६ गुण मिळवता आल्यामुळे पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले. या गटातील सुवर्ण, रौप्य व ब्राँझ ही तिन्ही पदके अमेरिकेच्या महिला नेमबाजांनी जिंकली. पुरुष गटामध्ये स्कीट प्रकारात भारताच्या एकाही नेमबाजाला अंतिम फेरीत पोहोचता आले नाही. (Mixed gold)

https://twitter.com/issf_official/status/1912499935133446610

हेही वाचा :
अभिषेक नायर यांना डच्चू
झाम्पाच्या जागी स्मारनची निवड

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00