नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी केवळ चार दिवस उरले आहेत. या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षाच्या विद्यमान सात आमदारांनी राजीनामा दिला आहे. ‘आप’साठी हा धक्का मानला जात आहे. तथापि, राजीनामा दिलेल्यांना या निवडणुकीत पक्षाने उमेदवारी दिलेली नाही. (7 mlas quit aap)
रोहित कुमार मेहरौलिया (त्रिलोकपुरी), राजेश ऋषी (जनकपुरी), मदन लाल (कस्तुरबा नगर), नरेश यादव (मेहरौली), भूपिंदर सिंग जून (बिजवासन), भावना गौर (पालम) आणि पवन शर्मा (आदर्श नगर) अशी राजीनामा दिलेल्या या आमदारांची नावे आहेत.
पालम येथील आमदार भावना गौर यांनी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना पत्र लिहिले आहे. आपण पक्षावरील विश्वास गमावल्याने पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. कस्तुरबा नगरचे आमदार मदन लाल यांनीही अशाच भावना व्यक्त केल्या आहेत. ‘मी आम आदमी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. कारण माझा तुमच्यावर आणि पक्षावरील विश्वास उडाला आहे. कृपया राजीनामा स्वीकारा,’ असे गौर यांनी त्यांच्या राजीनामापत्रात म्हटले आहे.(7 mlas quit aap)
आम आदमी पक्षाने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या अधिकृत यादीत पक्षाने आदर्श नगर येथून मुकेश गोयल यांना संधी दिली आहे. प्रविण कुमार यांना जनकपुरी, सुरेंद्र भारद्वाज यांना बिजनवास, जोगींदर सोलंकी यांना पालम, रमेश पेहलवान यांना कस्तुरबा नगर, नरेश यादव यांना मेहरौली आणि अनजना पर्चा यांना त्रिलोकपुरी येथून उमेदवारी दिली आहे. (7 mlas quit aap)
यमुनाप्रश्नी आयोगाला उत्तर
दरम्यान, आपचे संयोजक अरविंद केजरीवाल शुक्रवारी निवडणूक आयोगाच्या कार्यालयात दाखल झाले. त्यांनी यमुनेच्या पाण्याबद्दल केलेल्या ‘विषमिश्रित’ टिप्पणीबाबत निवडणूक आयोगाच्या नोटिसीवर म्हणणे मांडले. आयोगासोबतच्या बैठकीपूर्वी पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी दिल्लीकरांचे आभार मानले. आप सरकारच्या प्रयत्नांमुळे २६-२७ जानेवारीला यमुनेच्या पाण्यातील अमोनियाची पातळी ७ PPM वरून २.१ PPM झाली. भाजपच्या नेतृत्वाखालील हरियाणा सरकारला दिल्लीत संकट निर्माण करायचे होते, हे यावरून स्पष्ट होते, असा आरोपही केजरीवाल यांनी केला.
AAP National Convenor @ArvindKejriwal writes back to CEC Rajiv Kumar on the issue of dangerous levels of ammonia in the raw water supplied by Haryana to Delhi.
“My only concern is the health and safety of the people of Delhi and I will fight for the protection of our democratic… pic.twitter.com/8qWXEkVv98
— AAP (@AamAadmiParty) January 31, 2025
हेही वाचा :