महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : अल्बानियातील तिराना येथे रविवारी (दि.२७) झालेल्या २३ वर्षाखालील कुस्ती स्पर्धेत भारताचा १८ वर्षीय कुस्तीपटू चिराग चिक्काराने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. स्पर्धेत चिरागने ५७ किलो वजनी गटात सुवर्ण पदक पटकावत ही कामगिरी केली. अटी-तटीच्या सामन्यात चिरागने किरगिझस्तानचा खेळाडू अब्दिमलिक काराचोव्हचा ४-३ अशा फरकाने पराभव केला. अशी कमागिरी करणारा चिराग भारताचा दुसरा खेळाडू ठरला आहे. (Chirag Chikara)
२०२२ साली झालेल्या २३ वर्षाखालील कुस्ती स्पर्धेत भारताचा कुस्तीपटू अमन सेहरावने सुवर्ण पदकाची कमाई केली होती. यानंतर चिरागने या कामगिरीची पुनरावृत्ती करत मोठे यश संपादन केले आहे. यासह भारताच्या रितिका हुड्डाने २०२३ साली इतिहास रचला होता. अंडर २३ वर्ल्ड चॅम्पियनशिपचे विजेतेपद पटकावणारी ती पहिली भारतीय महिला ठरली होती.
कुस्तीपटू चिरागने पहिल्या फेरीत जपानच्या गातुको ओजावा याच्यावर ६-१ असा विजय मिळवला होता. यानंतर त्याने उपांत्यपूर्व फेरीत अझरबैजानच्या इयुनस इवबतिरोव्हचा १२-२ असा पराभव केला. तर, उपांत्य फेरीत कझाकिस्तानच्या ॲलन ओरलबेकवर मात करून अंतिम सामन्यात पोहोचला. यासह २३ वर्षाखालील जागतिक कुस्ती चॅम्पियनशिपमध्ये भारताच्या सुजित कलकल आणि विकी याने कांस्यपदक मिळवले. Chirag Chikara
हेही वाचा :
- आमदारकीसाठी दुभंगली कुटुंबे
- टरबुज्याची नजर सांगायची, ‘मी पुन्हा येईन… मी पुन्हा येईन…’
- अनिल देशमुखांचा ‘होम मिनिस्टर’, ऐन निवडणुकीत वाढविणार संशयकल्लोळ!