कोल्हापूर : प्रतिनिधी : डोक्याला रिव्हॉल्व्हर लावून हॉटेलमधील दोन कामगारांना अमानुष मारहाण झाल्याची घटना घडली. दोन्ही कामगार नेपाळचे असल्याची माहिती पुढे आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले पोलिस ठाण्यात चौघां संशयितांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (Workers attacked)
हातकणंगले पोलिसांनी गुन्ह्याची माहिती दिली. सावली हॉटेलचे व्यवस्थापक अभिषेक भोघारी (वय २४) आणि जितुभारती ध्रुवभारती (वय २४, सध्या रा. हेरले, ता. हातकणंगले) हे माले फाट्यावर एका पानटपरीवर थांबले होते. त्या ठिकाणी बाबा हॉटेलचा चालक टिपु सुलतान खतीब सहकाऱ्यांना घेऊन आला आणि दोघांची चौकशी केली. त्यातील एकाने अभिषेककडील हॉटेलचे मेन्यू कार्ड बघितले. मेन्यू कार्ड बघितल्यानंतर टिपु सुलतान खतीबने अभिषेक आणि जितुकुमारच्या डोक्याला रिव्हॉल्व्हर लावले आणि बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. टिपु सुलतानचे सहकारी मोहमद कुरेशी, प्रवीण पाटील, मनोद कांदे (सर्व रा. हेरले) यांनी काठी आणि लोखंडी सळीने दोघांना मारहाण केली. (Workers attacked)
मारहाणीत दोघे जखमी झाले. अमानुष मारहाणीत दोघांची पाठ, मांडी आणि पायावर रंक्तबंबाळ व्रण उठले आहेत. दोघांना हातकणंगले ग्रामीण रुग्णालयात उपचारास दाखल करण्यात आले. हातकणंगले पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिस निरीक्षक शरद मेमाणे तपास करत आहेत. (Workers attacked)
हेही वाचा :
दलितांचे हत्याकांड; तिघांना फाशीची शिक्षा