Home » Blog » Mahakumbh 2025 कुंभमेळ्याचा ४५ कोटी भाविकांचा आकडा कुठून आला?

Mahakumbh 2025 कुंभमेळ्याचा ४५ कोटी भाविकांचा आकडा कुठून आला?

कुंभमेळ्याला ४५ ते ५० हजार कोटी भाविक भेट देणार असल्याचे दावे करण्यात आले आहेत. त्यामागे अर्थात कुंभमेळ्याच्या बजेटचं कारण असल्याचं सांगण्यात येतं.

by प्रतिनिधी
0 comments

कुंभमेळ्याचं आर्थिक गणित समजून घेण्याची गरज आहे. ते समजून घेतले तर सामान्य माणसांचे डोळे पांढरे होतील अशी स्थिती आहे. सरकारला कुंभमेळा इतका का महत्त्वाचा वाटतो? महत्त्वाचा वाटतो त्यामागचं कारण धार्मिक आहे की आर्थिक ? धार्मिक आवरणाखाली कोट्यवधींचा आर्थिक घोटाळा कसा साकारला जातो…?  हे समजून  घ्यायला हवं. तर पुढील वर्षी नाशिकला सिंहस्थ कुंभमेळा होतोय. त्यासाठीचं बजेट आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून होणा-या मारामारीचा अर्थ उमगेल. (Mahakumbh 2025)

नाशिकला गोदावरी काठावर २०२७ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होत आहे. त्याच्या तयारीसाठी आठवडाभरापूर्वी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी तयार केलेला सुमारे १४ हजार कोटींचा प्रारुप आराखडा यावेळी सादर करण्यात आला. २०१५ मधील कुंभमेळ्याचा आराखडा सुमारे २३०० कोटींचा होता. यावरून कुंभमेळ्याचा वाढलेला खर्च आणि त्याच्या एकूण स्वरुपाची कल्पना येऊ शकते.(Mahakumbh 2025)

नाशिक, त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या कुंभमेळ्याच्या तयारीसाठी दोन वर्षांचा अवधी आहे. त्याची तयारी सुरू आहे. कुंभमेळा नजरेसमोर ठेवूनच नाशिकचं पालकमंत्रिपद भाजपनं आपल्याकडं ठेवलं. मुख्यमंत्र्यांचे विश्वासून मंत्री गिरीश महाजन यांच्याकडं ती जबाबदारी देण्यात आली. एकनाथ शिंदे यांनी त्याला आक्षेप घेतला. दादा भुसे यांची त्यासाठी दावेदारी होती. शिंदे यांच्या नाराजीची तीव्रता लक्षात घेऊन नाशिकच्या पालकमंत्रिपदासाठी तूर्तास स्थगिती देण्यात आली आहे. कशी तडजोड होते बघूया. कारण नाशिकच्या पालकमंत्रिपदावर अजितदादांच्या पक्षाचा हक्क आहे. परंतु त्यांना शांत करण्यात देवेंद्र फडणवीस यांनी यश मिळवले. परंतु एकनाथ शिंदे ऐकायला तयार नाहीत ही वस्तुस्थिती आहे.(Mahakumbh 2025)

प्रयागराजच्या कुंभमेळ्याचं गणित

मुद्दा आहे सध्याच्या प्रयागराजला सुरू असलेल्या कुंभमेळ्याचा. या कुंभमेळ्याला ४५ ते ५० हजार कोटी भाविक भेट देणार असल्याचे दावे करण्यात आले आहेत. त्यामागे अर्थात कुंभमेळ्याच्या बजेटचं कारण असल्याचं सांगण्यात येतं.
कुंभमेळ्याला येणा-या भाविकांच्या संख्येचं गणित तपासलं तर आकड्यांची गंमत लक्षात येऊ शकेल. (Mahakumbh 2025)

बघा, अलाहाबाद म्हणजे प्रयागराज येथून दिवसाच्या २४ तासात सुमारे अडीचशे रेल्वे गाड्यांची ये-जा होत असते. रोज धावणा-या, साप्ताहिक शिवाय विशेष गाड्या. अशा सगळ्या गाड्या धरून हा सरासरी आकडा आहे. तरीसुद्धा रोजच्या सरासरी काढल्या तर दोनशेपर्यंत आकडा जातो.

एका रेल्वेगाडीला पंधरा ते वीस डबे असतात. प्रत्येक डब्यात ७२ प्रवाशी असतात. येणा-या आणि जाणा-या गाड्या मिळून दोनशे गाड्या. गुणिले वीस डबे गुणिले ७२ प्रवाशी हा आकडा होतो दोन लाख ८८ हजार.
या दोन लाख ८८ हजारांपैकी ७५ टक्के कुंभ स्नानासाठी उतरतात असे गृहित धरुया. म्हणजे २५ टक्के प्रवासी पुढे निघून जातात. रोजचा आकडा होतो, दोन लाख १६ हजार.

रस्ता मार्गे अडीच लाख

रस्तामार्गे कार, बस, टॅक्सी किंवा पायी येणारे रोज अडीच लाख. म्हणजे रेल्वेने येणारे आणि रस्तामार्गे येणारे मिळून होतात रोजचे पाच लाख.
यात विमानानं येणारे, जहाजाने येणारे. शिवाय परमेश्वराप्रमाणं थेट स्नानासाठी प्रकट होणारे लोक धरले नाहीत. एवढा मोठा धार्मिक सोहळा. तिथे काही अद्भूत शक्तिनं प्रकट होणारे चमत्कारी लोक असू शकतात. नाही कसं म्हणायचं. असे वीस-पंचवीस हजार नाही, तर आणखी पाच लाख लोक त्यात समाविष्ट करुया. कुणी म्हणायला नको, की मुद्दाम संख्या कमी केली म्हणून.
ओके ? तर टोटल झाली रोज दहा लाख.(Mahakumbh 2025)

बरोबर ना?
कुंभमेळा चालणार ३९ दिवस.
३९ दिवस रोज दहा लाख भाविक म्हणजे एकूण झाले तीन कोटी ९० लाख भाविक.

एकटे मोदीजी दहा लाखांच्या बरोबर

काही माणसं एकटी असली तरी त्यांना हजारांच्या संख्येत मोजावं लागतं. जसे की आपले मोदीजी. एकट्या मोदीजींना दहा लाखांच्या बरोबर धरलं. तर एकूण झाले चार कोटी.
चार कोटी संख्या कमी वाटते का? म्हणजे हिंदूंच्या एवढ्या ऐतिहासिक सोहळ्याचं महत्त्व कमी केल्यासारखं.
मग दहा कोटी धरा.
तरीही कमी वाटतात?
चला वीस कोटींमध्ये सेटल करूया.

किती ही फेकाफेकी…

मग हा ४५ कोटींचा आकडा कुठून आला?

फेकाफेकी करण्याची सवय देशवासीयांना आता चांगली परिचित झाली आहे. पण या फेकाफेकीच्या राजकारणात किमान कुंभमेळा तरी सोडायला हवा. तिथं गांजा पिऊन फेकाफेकी करणा-या साधूंची कमतरता नाही. ही फेकाफेकी ऐकून त्यांना किती गिल्ट येईल, याची कल्पना आहे का?

कुंभमेळ्याचं महत्त्व आहेच. अध्यात्मिक महत्त्व कुणी कमी लेखलेलं नाही. तिथं कितीही गांजाडे आणि बहुरूपी आले तरी कुंभमेळा तो कुंभमेळा. तिथं एका माणसानं पवित्र किंवा शाही स्नान केलं की एक करोड लोकांनी! त्यानं काही कुंभमेळ्याला फरक पडत नाही. कुंभमेळा तो कुंभमेळाच असणार.

तिथं खोटे दावे करण्याचं कारण काय?

एक गोष्ट असू शकते.
पाच हजार कोटींचं बजेट जस्टिफाय करायचं.  तर त्यासाठी आकडा मोठा सांगितलाच पाहिजे.
लक्षात येतंय का कुंभमेळ्याचं अर्थकारण आणि राजकारण?

नाशिकच्या कुंभमेळ्यापुढं प्रयागराजचाच आदर्श असेल. त्यामुळं इथं त्याहून वेगळं काही घडण्याची अपेक्षा वाटत नाही.

(संदर्भः मनीष सिंग यांची फेसबुक पोस्ट)

हेही वाचाः
Lost boy Found : कुंभमेळ्यात सापडला पोटचा गोळा!
Mahakumbh PM : महाकुंभ : पंडित नेहरू ते मोदी
IITian Baba : आयआयटीयन बाबा सत्याच्या शोधात

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00