Home » Blog » West Indies : वेस्ट इंडिजची विजयी आघाडी

West Indies : वेस्ट इंडिजची विजयी आघाडी

दुसऱ्या ‘वन-डे’त बांगलादेशचा ७ विकेटनी पराभव

by प्रतिनिधी
0 comments

बॅसटेअर : वेस्ट इंडिजने बांगलादेशविरुद्धच्या वन-डे क्रिकेट मालिकेतील दुसरा सामना ७ विकेटनी जिंकून सलग दुसरा विजय नोंदवला. या विजयासह विंडीजने तीन सामन्यांच्या या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. (West Indies)
या वन-डे सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या बांगलादेशचा डाव ४५.५ षटकामध्ये २२७ धावांत आटोपला. बांगलादेशतर्फे केवळ मधल्या फळीतील महमदुल्लाला अर्धशतकी मजल मारता आली. त्याने ९२ चेंडूंमध्ये २ चौकार व ४ षटकारांच्या मदतीने ६२ धावांची खेळी केली. वेस्ट इंडिजकडून जेडन सील्सने चार, तर गुडाकेश मोतीने दोन विकेट घेतल्या.
बांगलादेशच्या धावसंख्येचा पाठलाग करताना ब्रेंडन किंग आणि एविन ल्युइस या वेस्ट इंडिजच्या सलामीवीरांनी संघाला १०९ धावांची सलामी दिली. ल्युईस बाद झाल्यानंतर किंगने केसी कार्टीसोबत ६६ धावांची भागीदारी रचली. किंगने ७६ चेंडूंमध्ये ८ चौकार व ३ षटकारांसह ८२ धावा फटकावल्या. सदतिसाव्या षटकात कर्णधार शाय होप आणि शेर्फेन रुदरफोर्ड यांनी वेस्ट इंडिजचा विजय साकारला. या दोन संघांमधील तिसरा व अखेरचा सामना गुरुवारी, १२ डिसेंबर रोजी रंगणार आहे.

https://www.espncricinfo.com/series/west-indies-vs-bangladesh-2024-25-1433357/west-indies-vs-bangladesh-2nd-odi-1433381/full-scorecard

हेही वाचा : 

रूटला मागे टाकत ब्रुक अव्वलस्थानी

बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीतील तिसऱ्या कसोटीच्या वेळेत बदल

 

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00