Home » Blog » फडणवीसांच्या हातात सत्ता द्यायची नाही : शरद पवार

फडणवीसांच्या हातात सत्ता द्यायची नाही : शरद पवार

तासगाव येथील सभेत निर्धार; तरुणांना नेतृत्वाचे आवाहन 

by प्रतिनिधी
0 comments
sharad pawar file photo

सांगली;  प्रतिनिधी : विधानसभा निवडणुकीत काँग्रेस, शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष आणि डाव्या कम्युनिस्ट पक्षांना एकत्र घेऊन आम्ही निवडणूक लढत आहोत. महाराष्ट्राच्या राजकारणात वाटेल ते झालं तरी चालेल, पण देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या घटकांच्या हातात महाराष्ट्राची सत्ता जाऊ द्यायची नाही. त्या दृष्टीने ही विधानसभा निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे, असा निर्धार माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी तासगाव येथे व्यक्त केला. (Sharad Pawar)

महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तासगाव-कवठेमंकाळ मतदारसंघातील विधानसभेचे उमेदवार रोहित पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित तासगावमधील सभेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी तरुणांना नेतृत्व करण्याचे आवाहन केले. तसेच माजी खासदार संजय पाटील यांच्यावरही टीका केली. यावेळी खासदार शरद पवार म्हणाले, ‘आम्ही निवडणुकीत फक्त जिंकण्यासाठी मते मागत नाही, काम करण्यासाठी मते मागतो. आमचा विकासाचा कार्यक्रम आहे. त्यासाठी मतदान करा, असा आग्रह धरतो. आज ज्यांच्याकडे राज्याची सत्ता आहे ते पैशांचा गैरवापर करत आहेत. निवडणुकीत दुसरे काही नाही. फक्त पैसे  टाकायचे आणि माणसे विकत घ्यायचा प्रयत्न करायचा, हेच सरकारचे धोरण आहे. या सरकारने काही कार्यक्रम हाती घेतले आहेत, पण या कार्यक्रमातील सत्यता पडताळण्याची गरज आहे. माजी खासदार संजय पाटील हे उद्योगी आहेत. त्यांची पहिली विधान परिषद आठवते.

आर. आर. पाटील एक दिवस माझ्याकडे आले आणि म्हणाले, विधान परिषदेच्या एका जागेसाठी माझा आग्रह आहे. मी म्हटलं कोणाच्या नावासाठी, तर आर. आर. म्हणाले, संजय पाटलांच्यासाठी आहे. मी आर. आर. यांना म्हटले, ‘मला पसंत नाही, दुसरं नाव सांगा’,  पण आर. आर. पाटलांनी खूपच आग्रह धरला. मी म्हटलं त्यांचा काही भरवसा नाही, ते तुमच्यासोबत राहतील याची खात्री नाही. तेव्हा आर. आर. म्हणाले, ‘ते माझ्या भागातील आहेत. काही करा पण माझं एवढं ऐका’. शेवटी आम्हाला आर. आर. यांचा आग्रह मोडता आला नाही. त्यानंतर संजयकाका पाटील सहा वर्षे आमदार राहिले. आमदारकीच्या कार्यकाळाचा शेवटचा दिवस होता, त्या दिवशी ते भाजपात गेले. त्यानंतर ते १० वर्षे खासदार राहिले. आता खासदारकी गेल्यानंतर त्यांनी पुन्हा पक्ष बदलला.” (Sharad Pawar)

यावेळी उमेदवार रोहित पाटील, खासदार विशाल पाटील, आमदार सुमन पाटील, भारत पाटणकर, अनिता सगरे, वसंतराव चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले. आमदार अरुण लाड, अनिता सगरे, डॉ. भारत पाटणकर, वसंतराव चव्हाण यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

लाडक्या बहिणीच्या सुरक्षेचे काय?

महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना सुरू केलीय याला आमची हरकत  नाही, पण राज्यात ६७ हजार ३८१ महिला गायब आहेत, तासाला पाच महिलांवर अत्याचार होतात. ही अतिशय गंभीर बाब आहे. त्यांच्या सुरक्षेचे काय? अशी विचारणा यावेळी खासदार शरद पवार यांनी केली.

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00