Home » Blog » सोमवारी कोल्हापूरात पाणीपुरवठा बंद

सोमवारी कोल्हापूरात पाणीपुरवठा बंद

मंगळवारी होणार कमी दाबाने पुरव

by प्रतिनिधी
0 comments
Kolhapur News

कोल्हापूर; प्रतिनिधी : कोल्हापूर शहरात मुख्य विद्युत वाहिणीच्या देखभाल दुरुस्तीच्या कामांमुळे सोमवारी (दि.९) पाणी पुरवठा बंद राहणार आहे. तर, मंगळवारी (दि.१०) कमी दाबाने अपुरा पाणी पुरवठा होणार आहे. नागरिकांनी काटकसरीने पाण्याचा वापर करावा, असे आवाहन महानगरपालिकेने दिले आहे. (Kolhapur News)

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या बालिंगा सब स्टेशनच्या ३३ केव्ही मुख्य वीज वाहिनीचे मासिक देखभाल दुरुस्तीचे कामकाज सोमवार, करण्यात येणार असल्याने विद्युत पुरवठा बंद रहाणार आहे. त्यामुळे सोमवारी  दैनंदिन पाणी पुरवठा बंद होणार आहे.  मंगळवारी अपुरा व कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे. ए,बी,सी आणि डी वॉर्ड आणि  ई वॉर्डातील काही भागात पाणी पुरवठा होणार नाही. पण राजारामपुरी, कसबा बावडा, ताराबाई पार्क, नागाळा पार्क, शिवाजी पार्क, जाधववाडी, कदमवाडी, मार्केट यार्ड, कावळा नाका या परिसरात पाणी पुरवठा सुरळीत राहणार आहे.

शहरातील पाणीपुरवठा बंद होणारे भाग असे.  लक्षतीर्थ वसाहत, संपूर्ण फुलेवाडी रिंगरोड, सानेगुरुजी वसाहत, राजेसंभाजी, क्रशर चौक, आपटेनगर टाकी परिसर, राजोपाध्येनगर, कणेरकरनगर, क्रांतीसिंह नाना पाटीलनगर, तुळजाभवानी कॉलनी, देवकर पाणंद, टेंबे रोड,  शिवाजी पेठ, चंद्रेश्वर गल्ली, तटाकडील तालीम परिसर, साकोली कॉर्नर, उभा मारुती चौक, बिनखांबी गणेश मंदिर परिसर, महाव्दार रोड, मंगळवार पेठ काही भाग. संपूर्ण सी डी वॉर्ड दुधाळी, गंगावेश, उत्तरेश्वर पेठ, शुक्रवार पेठ, ब्रम्हपुरी, बुधवार पेठ तालिम, सिद्धार्थनगर, पापाची तिकटी परिसर, लक्ष्मीपुरी, शनिवार पेठ, सोमवार पेठ, ट्रेझरी ऑफीस, बिंदु चौक, आझाद चौक परिसर, उमा टॉकीज परिसर, अंबाबाई मंदीर परिसर, गुजरी, मिरजकर तिकटी, देवल क्लब, खानविलकर पेट्रोल पंप परिसर, शाहुपूरी पाचवी, सहावी, सातवी, आठवी गल्ली, कुंभार गल्ली व बागल चौक इत्यादी परिसरात पाणी पुरवठा होणार नाही. तरी या भागातील नागरिकांनी उपलब्ध पाणी काटकसरीने वापरून महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्यावतीने करण्यात आले आहे. (Kolhapur News)

हेही वाचा :

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00